आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापसाची आवक अत्यल्प:चाळीसगावात कपाशीला 9,500 रुपयांचा भाव

चाळीसगाव12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतिवृष्टीमुळे यंदा कापूस उत्पादनात घट होणार असल्याचा अंदाज आहे. तसेच ऑक्टोबरपर्यंत पाऊस सुरू राहिल्यामुळे बाजारात कापसाची आवक अत्यल्प आहे. त्यामुळे खासगी बाजारात कपाशीचे दर ९,५०० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले आहेत. तर बाजार समितीत सोयाबिनला प्रतिक्विंटल ५ हजार ५०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.

गेल्यावर्षी कापसाला विक्रमी १४ हजार रुपये क्विंटलपर्यंत दर मिळाला होता. हा विक्रमी दर अधिक काळ टिकला नाही. मात्र ११ हजार ते १२ हजार क्विंटल दराने अनेक शेतकऱ्यांनी कापूस विक्री केला होती. महिनाभरापूर्वी जिल्ह्यातील काही भागात कापूस निघायला सुरुवात झाली होती.

दिवाळी सण किंवा रब्बी हंगामाच्या तयारीसाठी काही शेतकऱ्यांनी बाजारात कापूस विक्रीसाठी आणला. मात्र, दर केवळ सात ते आठ हजार रुपये क्विंटल होते. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र, गेल्या चार ते पाच दिवसांपासून खासगी बाजारात कपाशीचे दर साडेनऊ हजार रुपयांपर्यंत गेले आहेत.

बातम्या आणखी आहेत...