आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:अमळनेर तालुक्याचा 97 टक्के निकाल; 30शाळांचे 100% यश

चाळीसगाव15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेर तालुक्याचा दहावीचा ९७.०४% निकाल लागला आहे. तालुक्यातून ३ हजार ७५१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यात ३ हजार ६४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ३० माध्यमिक शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे. तालुक्यातून प्रथम व द्वितीय क्रमांक सेंट मेरी इंग्लिश स्कूलच्या दीपक राजेंद्र पाटील (९९.२०%) व उमेश विश्वासराव मोतीराळे (९९%) याने द्वितीय क्रमांक मिळवला आहे. यात गंगाराम सखाराम हायस्कूलचा ९७.७९ टक्के निकाल लागला आहे.

तर श्रीमती द्रोपदीबाई रामचंद्र-शेठ कन्या शाळेचा ९७.८७ टक्के, नगरपालिका माध्यमिक विद्यालयाचा ६२.५० टक्के, के. डी. गायकवाड माध्यमिक विद्यालय ९८.८२%, लोकमान्य विद्यालय ९६.४७%, सावित्रीबाई फुले कन्या माध्यमिक विद्यालय ९४.११, साने गुरुजी कन्या हायस्कूल ९७.९१, साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय ९९.१०, जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय ९६, श्री शिवाजी हायस्कूल ९६.७७, अल-फैज उर्दू गर्ल्स हायस्कूल ९६.९२, नॅशनल उर्दू हायस्कूल ९२.६८, शेठ पी. बी. अग्रवाल इंग्लिश मीडियम स्कूल ९७.९५, पिंपळे येथील स्वर्गीय एस. ए. पाटील माध्यमिक विद्यालय ९४.७३, मंगरूळ येथील ग्रामविकास माध्यमिक विद्यालय ९६.४२, शिरूड येथील विनायकराव झिपरू पाटील हायस्कूल ९५.४५,

नगाव-गडखांब येथील माध्यमिक विद्यालय ९४.८२, देवगाव येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल ९६.४२, पातोंडा येथील श्री दत्त विद्या मंदिर ९६.३६, झाडी येथील ग्रुप उदय माध्यमिक विद्यालय ९३.७५, शिरसाळे येथील भिका यशोदा चौधरी हायस्कूल ९७.२९, दहिवद येथील नवभारत माध्यमिक विद्यालय ९४.७३, मारवड येथील एस. एच. मुंदडे हायस्कूल ८९.०९, डांगरी येथील न्यू इंग्लिश स्कूल ९६, वावडे येथील बी. बी. ठाकरे हायस्कूल ९६.३६, मांडळ येथील आदर्श हायस्कूल ९६.६१, कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालय ९५.२९, अमळगाव येथील आदर्श विद्यालय ९४.५२, दोधवद येथील माध्यमिक विद्यालय ८३.३३, पिंपळी येथील महात्मा फुले माध्यमिक विद्यालय ८९.२८, गांधली- पिळोदे येथील बालाजी विद्यालय ९७.२९, अंतुर्ली- रंजाणे येथील नवीन माध्यमिक विद्यालय ९६.९६,

रुंधाटी- मठगव्हाण- नलखेडा येथील एन. एम. विद्यामंदिर ९६.८७, डांगर बुद्रुक येथील योगेश्वर माध्यमिक विद्यालय ९०, सारबेटे येथील स्वर्गीय आक्कासो के. व्ही. पाटील सार्वजनिक विद्यालय ९७.२९, पाडसे येथील सरस्वतीबाई माध्यमिक विद्यालय ९४.११, स्वा. स. पं. मुंदडा माध्यमिक विद्यालय ९७.७७, रणाईचे येथील श्री. ए. एम. कालू पाटील माध्यमिक आश्रमशाळा ९०.६९, गडखांब येथील स्वर्गीय खुशालदादा माध्यमिक आश्रमशाळा ८५.७१, पिंगळवाडे येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा ९०.६२, दहिवद येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा ९६.८७, व्ही. एन. पाटील आर्मी स्कूल ९८, ताडेपूरा येथील एल. ए. एच. पाटील आदिवासी आश्रमशाळा ९६.७७, जैतपीर येथील के. पी. सोनार माध्‍यमिक विद्यालय ९२.३०, माध्यमिक विद्यालय ४६.६६% निकाल लागला.

१०० टक्के निकाल लागलेल्या तालुक्यातील शाळा
प्रताप हायस्कूल, चौबारी येथील बाबासाहेब डी. एन. पाटील माध्यमिक विद्यालय, टाकरखेडा येथील माध्यमिक विद्यालय, कुऱ्हे येथील माध्यमिक विद्यालय, करणखेडा येथील व्ही. वाय. पाटील माध्यमिक विद्यालय, लोण ग्रुप येथील माध्यमिक विद्यालय, भरवस येथील स्वर्गीय एस. जी. सोनवणे माध्यमिक विद्यालय, मुडी येथील झिपरू दशरथ सोनवणे हायस्कूल, निंब येथील नंदादीप माध्यमिक विद्यालय, शहापूर येथील एकात्मता माध्यमिक विद्यालय, निंभोरा येथील माध्यमिक विद्यालय, तासखेडे-आमोदे येथील सर्वेश्वर माध्यमिक विद्यालय, मालपूर येथील आबासाहेब एस.एस.पाटील माध्यमिक विद्यालय, सावखेडा येथील किसन दाजी पाटील हायस्कूल, फापोरे बुद्रुक येथील पंडित नेहरू माध्यमिक विद्यालय, सडावण येथील सरस्वती माध्यमिक विद्यालय, जानवे येथील किसान माध्यमिक विद्यालय, काव-पिंप्रीचे सर्वोदय माध्यमिक विद्यालय, लोंढवे येथील कै. आबासाहेब एस. एस. पाटील माध्यमिक विद्यालय, रणाईचे येथील माध्यमिक विद्यालय, ढेकू खुर्द येथील माध्यमिक विद्यालय, चोपडाई येथील सद्गुरु पब्लिक स्कूल, मंगरूळचे सेंट मेरी इंग्लिश मीडियम स्कूल, बाेहरे येथील माध्यमिक विद्यालय, अंतुर्ली-रंजाणे येथील माता बिजा सनी माध्यमिक शाळा, पिंपळे बुद्रुक येथील यशवंत माध्यमिक आश्रमशाळा, एन. टी. मुंदडा ग्लोबल स्कूल, टाकरखेडा येथील माध्यमिक विद्यालय, रॉयल उर्दू हायस्कूल, जवखेडा येथील श्री. एम. के. पाटील इंटरनॅशनल स्कूल या ३० शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे.

चोपडा | येथील पंकज माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा १०० % निकाल लागला आहे. २१६ पैकी १९७ विद्यार्थ्यानी ७०%पेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत. दहावीत प्रज्ज्वल परमेश्वर पाटील याने ९८.२०% गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. नचिकेत किरण पाटील याने ९८% गुण प्राप्त करत द्वितीय तर किंजल अनिल माळी या विद्यार्थिनीने ९६.८०% गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला. ५० विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थाध्यक्ष डॉ. सुरेश पी. बोरोले, उपाध्यक्ष अविनाश राणे, संचालक पंकज बोरोले, नारायण बोरोले, भागवत भारंबे, गोकुळ भोळे, सचिव अशोक कोल्हे, मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील व एम. व्ही. पाटील, प्राचार्य महादेव वाघमोडे व मिलींद पाटील, संदिप वन्नेरे, रेखा पाटील आदींनी काैतुक केले आहे.

९०%वरील गुणवंत
आयुष यशवंत चौधरी (९६.६०%), वेदांत रणछोड पाटील (९५.८०), सायली प्रवीण महाजन (९५.६०), रितीशा ज्ञानेश्वर सोनगीर (९५.२०), दिशा सुनील बागुल (९४.८०), रोहित नामदेव पाटील (९४.६०), राजदित्य भगवान नायदे (९४.६०), कार्तिका विश्वनाथ चौधरी (९४.४०), यशश्री किशोर धनगर (९४), यश चुडामन पाटील (९३.८०), गौरव ललित भालेराव (९३.६०), रोनित नितीन चौधरी (९३.६०), तन्मय मनोज जगताप (९३.६०, जयदीप जितेंद्र पाटील (९३), पूर्वा अनिलकुमार बाविस्कर (९३), सुमित विजयकुमार सोनवणे (९३), जान्हवी रामचरण कोळी (९२.८०), मोहित ज्ञानेश्वर सोळंके (९२.८०), देवश्री किशोर पाटील (९२.४०), प्राची दीपक चौधरी (९२.४०), देवेंद्र अशोक चिमणकर (९२.२०), नेहा रवींद्र पाटील (९२.२०), श्रुतिका संदीप महाजन (९१.६०), भाग्यश्री अनिल प्रतीक (९१.६०), अमृता राकेश पाटील (९१.६०), प्रियंका सिताराम नेरपगारे (९१.४०), रिया मुकेश महाजन (९१.४०), वैभव गोपाल माळी (९२), कल्याणी राजू कापुरे (९१.२०), नमित उमेश पाटील (९१), सुमित संभाजी पाटील (९१), कल्याणी संजय जाधव (९१), हिमेश धनंजय निकम (९०), तेजस रामकृष्ण पाटील (९०), दिव्या एकनाथ सैंदाने (९०.४०), धनश्री संदिप पाटील (९०.४०), कुंदन मोहन पाटील (९०.२०), रुचिका लक्ष्मण पाटील (९०.२०), ऋषिराज संदिप बोरसे (९०.२०), मिलिंद चैत्राम महाजन (९०.२०), सुमित संजय पाटील (९०.२०), मयुरी अरुण रायसिंग (९०.२०), वेदांत सुनील पाटील (९०), आशय अरुण मोरे (९०), प्रतीक अधिकार पाटील (९०), अपूर्वा जितेंद्र जाधव (९०), कौस्तुभ चंद्रकांत पाटील (९०).

चोपडा | येथील विवेकानंद विद्यालयाचा दहावीचा १०० टक्के लागला असून १३६ पैकी ९०%च्यावर २९ विद्यार्थी, विशेष योग्यता ८९ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत १७ विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत १ विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहे. विद्यालय व मुलींमधून प्रथम येण्याचा बहुमान तन्वी नितीन पाटील (९६.८०%) हिने प्राप्त केला आहे. अर्जुन रवींद्रकुमार पाटील (९६.२०) द्वितीय, गौरी किशोर भालोदकर (९६) तृतीय, मयूरी शशिकांत बागुल (९५.८०) ही चतुर्थ क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.

९०%च्यावर गुण प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये तेजस्विनी गजानन पाटील (९५%), मोहिनी विकास पाटील (९४.०२), मानसी मनोज सोनार (९४), ऋषिकेश मनोज पाटील (९३.८), ऋषिकेश अनिल पाटील (९३.६), ऋचा दिनेश दंडवते (९३), हर्षदा रवींद्र महाजन (९२.६), अंशुल दिनेश पोतदार (९२), पूजा विलासराव शिंदे (९२), दुर्गेश विजय शुक्ल (९१.८), मयंक भूषण भाट (९१.८), हर्ष संदीप पाटील (९१.६), आरुष नितीन बारी (९१.२), प्राजक्ता प्रवीण जाधव (९१), हर्षल रवींद्र बोरसे (९१), नंदन कैलास शिंपी (९०.८), रोहन सुनील पाटील (९०.८०), गौरी परमेश्वर खेकडे (९०.८०), प्रणव संजय महाजन (९०.६०), दिगंबर रामचंद्र महाले (९०.४०), राज राकेश साळुंखे (९०.४०), निशांत प्रशांत चौधरी (९०.४०), दर्शन जयेश चौधरी (९०.२०) व कोमल महावीर सुराणा व ओजस प्रफुल्ल अहिरराव या दाेघांनी ९०% गुण मिळवले आहेत. सर्व गुणवंतांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर, अध्यक्ष डॉ. विजय पोतदार, उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल आदींनी काैतुक केले आहे.

एरंडोल | एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ संचालित येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचा दहावीचा शंभर टक्के निकाल आहे. शाळेतून प्रणव ईश्वर पाटील (९२.८०%) याने प्रथम क्रमांक, रुपेश पंढरीनाथ बोरसे (९२.६०) द्वितीय तर किमया पगारिया (९२%) हिने तृतीय क्रमांक मिळवला आहे. शाळेतून ८ विद्यार्थी मेरीटमध्ये आले आहेत. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रिन्सिपल सरला विंचुरकर, व्हाइस प्रिन्सिपल सरिता पाटील, वर्ग शिक्षक कविता पाटील, सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांचे व संचालकांनी कौतुक केले आहे.
ग्रामिण उन्नती माध्यमिक विद्या मंदिर : ग्रामिण उन्नती मंडळ संचालित माध्यमिक विद्या मंदिराचा १००% निकाल लागला असून राधिका विजयसिंग पाटील (९०%) हिने प्रथम, अर्चना बापूराव पाटील (८५.६०%) द्वितीय तर मोहिनी मोहन पाटील (८५%) हिने तृतीय क्रमांक मिळवला आहे. सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष सचिन विसपुते, मुख्याध्यापिका अंजुषा चव्हाण, ए. आर. पाटील, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी काैतुक केले आहे.
रा. ती. काबरे विद्यालय : एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ संचालित रा. ती. काबरे विद्यालयाचा ८२.६२% निकाल लागला आहे. विद्यालयातून कृतिका अनिल शिंदे (८९.९०%) हिने प्रथम, रेवती सुकलाल पवार (८९.२०%) द्वितीय तर अनुष्का अतुल साळी (८९%) हिने तृतीय क्रमांक मिळवला. अनुज सुनील राठी याने ८८% गुण मिळवून मुलांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. सर्व गुणवंतांचे मुख्याध्यापिका आर. एस. मानधने, उपमुख्याध्यापिका एस. ए. पाटील, पर्यवेक्षक ए. आर. मालू, एन. एन. डागा, सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी काैतुक केले आहे.

पारोळा | श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ संचालित डॉ.व्ही.एम.जैन माध्यमिक व आप्पासाहेब यु.एच. करोडपती उच्च माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या परीक्षेत नूपूर जितेंद्र चंद्रात्रे या विद्यार्थिनीने १०० पैकी १०० टक्के गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. शाळेतील ३८ विद्यार्थी ९०%च्या वर गुणांनी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाच्या १००% निकाल लागला आहे. दहावीच्या परीक्षेत नूपूर चंद्रात्रे हिने १००% गुण मिळवून राज्यासह शाळेत प्रथम येण्याचा मान प्राप्त केला आहे. तर विद्यालयात नम्रता राजेश फुलपगारे (९८.८०%) द्वितीय, गौरी हितेश सराफ (९८%) तृतीय, महाजन मानसी जितेंद्र (९६.८०%) चतुर्थ व प्रीतम राजपूत (९६.६०%) ही पाचवी आली आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यु. एच. करोडपती, सचिव डॉ. सचिन बडगुजर, सर्व संचालकांनी काैतुक केले आहे. राज्यात प्रथम आलेल्या नूपूर चंद्रात्रे हिच्या घरी जाऊन सचिव डॉ. सचिन बडगुजर, प्राचार्य विजय बडगुजर, मुख्याध्यापक हेमंतकुमार पाटील, सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी तिचा सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना गुरू व आई-वडिलांच्या मार्गदर्शनाने मी हे यश संपादित करू शकले, माझे हे यश मी आपणा सर्वांना समर्पित करत आहे, अशा भावना या वेळी नुपूरने व्यक्त केल्या. पुन्हा एकदा राज्यात अधिकाधिक विद्यार्थी कसे येतील, यासाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेवू, असे आश्वासन प्राचार्य विजय बडगुजर यांनी दिले.

शेंदुर्णी | जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा दहावीचा सेमीचा १०० टक्के तर मराठी माध्यमाचा ९५.८५% निकाल लागला आहे. यात पूर्वा श्रीकांत काबरा ही विद्यार्थिनी ९८ टक्के गुणांसह जामनेर तालुक्यासह विद्यालयातून प्रथम आली आहे. तर द्वितीय क्रमांक ऐश्वर्या हितेंद्र गरुड (९६.६०%) हिने तालुक्यासह व विद्यालयातून द्वितीय आली आहे. विद्यालयातून वैष्णवी एकनाथ मिसाळ ९४.४० टक्के गुण मिळवून तृतीय तर चतुर्थ क्रमांक भक्ती सुनील शेटे (९३.४०) व पाचवा क्रमांक लोकेश पंडित थोरात (९३.२०) याने मिळवला आहे.

बातम्या आणखी आहेत...