आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटना:सावखेडा येथील ४२ वर्षीय मजुराचा; पाय घसरून नदीमध्ये पडल्याने मृत्यू

पाचोराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील सावखेडा येथील ४२ वर्षीय मजुराचा पाय घसरून नदी पात्रात पडल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.सावखेडा येथील शंकर मोहन गोपाळ (वय ४२) हे मजुरी करुन आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करत होते.

२ जून रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास मजुरीसाठी जात असताना बहुळा नदी पात्रात शंकर गोपाळ यांचा पाय घसरून ते पाण्यात पडले. ही घटना एका लहान मुलाने ग्रामस्थांना कळवल्यानंतर ग्रामस्थांनी शंकर गोपाळ यांना बाहेर काढून तत्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

परंतु, तपासणी करुन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी पाचोरा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत शंकर गोपाळ यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, मुलगा, मुली, भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

बातम्या आणखी आहेत...