आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिक्रमा‎:देवपिंप्रीतील 67 वर्षीय भाविकाने 89‎ दिवसात पायी पूर्ण केली नर्मदा परिक्रमा‎

रोटवद‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामनेर तालुक्यातील देवपिंप्री‎ येथील संतोष दौलत पाटील यांनी‎ वयाच्या ६७व्या वर्षी ८९ दिवस‎ पायी चालून नर्मदा परिक्रमा‎ यशस्वीपणे पूर्ण केली आहे.‎ संताेष पाटील यांनी ३१‎ आॅक्टाेबर २०२२ ते २७ जानेवारी‎ २०२३ या ८९ दिवसांच्या प्रदीर्घ‎ काळात पायी नर्मदा परिक्रमा सर्व‎ अडथळ्यांवर यशस्वीपणे मात‎ करून पूर्ण केली. त्यांचे ३०‎ जानेवारीला आपल्या गावात‎ आगमन झाल्यानंतर प्रारंभी‎ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या‎ प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात‎ आले.

त्यानंतर भजनी मंडळाने‎ व्यंकटेश मंदिरापर्यंत त्यांची भव्य‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मिरवणूक काढली. डिजेच्या‎ तालावर घोडा गाडीतून त्यांची‎ मिरवणूक काढण्यात आली हाेती.‎ यानिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम‎ झाला. तर या वेळी भाविकांना‎ स्नेहभोजन देण्यात आले. या सर्व‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ कार्यक्रमाचे नियोजन देवपिंप्रीतील‎ ग्रामस्थ, भजनी मंडळी,‎ नातेवाईक व त्यांच्या‎ मित्रपरिवाराने केले. याबद्दल‎ ग्रामस्थांसह भाविकांनी त्यांचे‎ काैतुक केले

बातम्या आणखी आहेत...