आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पथक:वीजमीटर बदलण्यासाठी घेतली पाच हजारांची लाच

अमळनेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील क्रांती नगरात राहणाऱ्या व्यक्तीकडून ५ हजारांची लाच घेताना वीज कंपनीचा तंत्रज्ञ भरत पाटील याला सोमवारी सायंकाळी रंगेहाथ ताब्यात घेतले. कनिष्ठ अभियंता वैभव देशमुख यांच्या सांगण्यावरुन लाच घेतल्याची माहिती त्याने एसीबीच्या पथकाला दिली. या प्रकरणी अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

क्रांती नगरातील रहिवाशाचे वीज मीटर ५ महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे त्यांनी वीज कंपनीत मीटर बदलण्यासाठी अर्ज दिला होता. कनिष्ठ अभियंता वैभव देशमुख व नंतर तंत्रज्ञ भरत पाटील यांनी पाहणी केली. त्यानंतर अभियंता देशमुख यांच्या सांगण्यावरुन वीज मीटर बदलून देण्यासाठी १० हजार रुपये द्यावे लागतील, अन्यथा तुमच्यावर दंडात्मक कारवाई होईल, असे सांगण्यात आले होते. याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिली. तडजोडीअंती ५ हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...