आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणुक ‎:डीलरशिपचे आमिष देत‎ दीड लाख रुपयांचा गंडा‎

चाळीसगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कंपनीच्या नावाने बनावट वेबसाईट तयार‎ करून व कंपनीची डीलरशिप देण्याचे‎ आमिष दाखवून चाळीसगाव येथील‎ व्यापाऱ्याला सुमारे दिड लाख रूपयांचा‎ गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला‎ आहे. याप्रकरणी दोन भामट्यांविरोधात‎ चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा‎ दाखल करण्यात आला आहे.‎ चाळीसगाव शहरातील शांती नगर,‎ पवारवाडी भागातील रहिवासी सुरेश‎ सबनदास रावलानी (वय ४०) या‎ व्यापाऱ्याला अमित कुमार व रवी नायर‎ (पूर्ण नाव माहित नाही) अशी स्वत:ची‎ ओळख सांगितली. या दाेन्ही व्यक्तींनी‎ स्वत:च्या लाभासाठी किया मोटर्स‎ कंपनीच्या नावाने बनावट वेबसाईट तयार‎ करून व स्वत: अमित कुमार आणि रवी‎ कुमार जनरल मॅनेजर असल्याची खोटी‎ बतावणी करून डीलरशिपसाठी‎ कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले.

या‎ कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर सुरेश‎ रावलानी यांना रजिस्ट्रेशन फी म्हणून‎ सुमारे १ लाख ५५ हजार रूपये खात्यावर‎ आयएफएससीवर भरण्यास सांगून सुरेश‎ रावलानी व साक्षीदारांची फसवणूक केली.‎ हा फसवणुकीचा प्रकार ६ ते १८ नोव्हेंबर‎ २०२२ दरम्यान बनावट वेबसाईटवर घडला.‎ या प्रकरणी रावलानी यांनी दिलेल्या‎ फिर्यादीवरून दोन्ही भामट्यांविरोधात‎ चाळीसगाव शहर पोलिसांत फसवणुकीचा‎ गुन्हा दाखल झाला आहे. तपास सपाेनि‎ सचिन कापडणीस करत आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...