आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐवज लंपास:एरंडोल येथे सराफा दुकान फाेडले;‎ अडीच लाखांचा ऐवज लांबवला‎

एरंडोल16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎येथील मेन रोडवर असलेल्या माऊली‎ ज्वेलर्स या सराफा दुकानाचे अज्ञात‎ चोरट्यांनी शटर वाकवून सुमारे अडीच‎ लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना‎ आज पहाटे उघडकीस आली. शहराच्या‎ प्रमुख रस्त्यावर असलेल्या व‎ गजबजलेल्या परिसरातील सराफ‎ व्यावसायिकाच्या दुकानात चोरी‎ झाल्यामुळे व्यापारी धास्तावलेले आहेत.‎ पोलिसांनी रात्री गस्त वाढवावी, अशी‎ मागणी सर्वत्र केली जात आहे.‎

नागोबामढी परिसरातील रहिवासी प्रसाद‎ अजय वाघ यांचे मेन रोडवर माऊली‎ ज्वेलर्स नावाने सोने, चांदी दागिने विक्रीचे‎ दुकान आहे. प्रसाद वाघ यांनी ६ मार्चला‎ सायंकाळी दुकान बंद केल्यानंतर ७ मार्चला‎ सकाळी नाशिक येथे ते विवाह‎ सोहळ्यासाठी गेले होते. १० मार्चला‎ नाशिक येथून विवाह सोहळा‎ आटोपल्यावर ते घरी परतले. तसेच रात्री ११‎ वाजेच्या सुमारास दुकानाकडे गेले,‎ त्यावेळी दुकानाचा दरवाजा लावलेला‎ असल्यामुळे ते पुन्हा घरी आले. दरम्यान,‎ शनिवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास‎ दुकानाशेजारी असलेल्या भगवान गोविंदा‎ चौधरी यांनी प्रसाद वाघ यांना फोन करून‎ तुमच्या दुकानाचे शटर वाकल्याचे‎ सांगितले. हे कळताच प्रसाद वाघ हे त्यांचे‎ बंधू सिद्धेश वाघ यांच्यासह दुकानाकडे‎ आले.

चारचाकीत हाेते ४ चाेरटे
सीसीटीव्ही फुटेजमध्ये छत्रपती शिवाजी‎ महाराज पुतळ्याकडून चारचाकी (ईको)‎ येत असल्याचे दिसतात. गाडीतील चार‎ व्यक्ती तोंडाला रुमाल लाऊन दुकानाचे‎ शटर उघडत असल्याचे दिसून आले.‎

बातम्या आणखी आहेत...