आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकस्मात मृत्यूची नोंद:चुंचाळेतील शेतमजुराची गळफासाने आत्महत्या

यावलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील चुंचाळे येथील रहिवासी ३५ वर्षीय शेतमजुराने साकळी शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. यावल पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली. चुंचाळे येथील सतीश शेनफडू पाटील (वय ३५) हा तरुण शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. सोमवारी तो साकळी शिवारातील उज्जैनसिंग राजपूत यांच्या शेतशिवारात कामाला गेला होता.

त्यांच्या शेताच्या बांधावरील निंबाच्या झाडाला ठिबक नळीने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. हा प्रकार दुपारी उघडकीस येताच पोलिसांना माहिती देण्यात आली. मृतदेह तेथून यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. घटनेचे कारण समोर आले नाही. योगेश कृष्णा पाटील यांच्या खबरी वरून अकस्मात मृत्यूची नोंद झाली. सतीशच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई-वडिल, भाऊ असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...