आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकस्मात मृत्यूची नोंद:किनगावात विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू

यावल4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरांना चारा घेण्यासाठी गेलेले किनगाव येथील ३९ वर्षीय शेतकरी शनिवारपासून बेपत्ता होते. रविवारी सकाळी त्यांचा शेतातील विहिरीत आढळला. चारा काढताना तोल जाऊन ते विहिरीत पडले असावे, असा अंदाज आहे. याप्रकरणी यावल पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली.

किनगाव बुद्रुक येथील रहिवासी शेतकरी लीलाधर रतिलाल काटे-धनगर (वय ३९) हे गुरांना चारा आणण्यासाठी शनिवारी शेतात गेले होते. मात्र, ते घरी परत आलेच नाहीत. सर्वत्र शोध घेऊनही उपयोग न झाल्याने यावल पोलिसांत हरवल्याची नोंद करण्यात आली. रविवारी सकाळी त्यांचा मृतदेह किनगाव शिवारातील सुरेश पंढरीनाथ देवरे यांच्या विहिरीत आढळला. विहिरीजवळ चारा काढताना ते तोल जाऊन पडले असावे व त्यात पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा असा अंदाज समोर आला. यावल ग्रामीण रुग्णालयात डॉ. जिशान खान यांनी शवविच्छेदन करत मृतदेह कुटुंबीयांना सोपवला. तपास हवालदार नरेंद्र बागुले करत आहे. मृत काटे यांच्या पश्चात आई-वडिल, भाऊ, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेत काटे कुटुंबाने कमावत्या व्यक्तीला गमावले आहे.

बातम्या आणखी आहेत...