आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विषबाधा:शेतात फवारणी करताना विषबाधेने बोदवड येथे शेतकऱ्याचा मृत्यू

बोदवड18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील उजनी रस्त्यावरील शेतामध्ये कपाशी पिकावर फवारणी करताना विषबाधा होऊन प्रभाकर रामदास वंजारी (वय ५७)यांचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

फवारणीवेळी वंजारी यांनी मळून तंबाखू खाताना त्यांच्या तोंडात फवारणीच्या विषारी औषधाचा अंश गेल्याने त्यांना विषबाधा झाली. त्यामुळे उलटी व मळमळ होऊ लागल्याने त्यांना सरकारी दवाखान्यात आणले. मात्र उपचारापूर्वी तपासणीत त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी अरविंद प्रभाकर वंजारी यांच्या खबरीवरून येथील अकस्मात मृत्यूची नोंद झाली.

बातम्या आणखी आहेत...