आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल:शिंदी येथील शेतकऱ्याची व्यापाऱ्याकडून फसवणूक

चाळीसगाव14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील शिंदी येथील शेतकऱ्यांकडून एका व्यापाऱ्याने ३१ क्विंटल अद्रकाची खरेदी करून, फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात व्यापाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील शिंदी येथील शेतकरी प्रदीप पांडुरंग आगोणे (वय ४३) यांनी, गेल्या वर्षी शेतीतून ३१ क्विंटल अद्रक उत्पादन घेतले. २० जुलै २०२० रोजी अरूण अशोक कुलकर्णी (रा.गणेशपूर, ता. चाळीसगाव) या व्यापाऱ्याने अगोणेंकडून ४ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने अद्रकाची खरेदी केली. त्यापोटी एक लाख २४ हजार रूपयांपैकी कुलकर्णी यांनी संबंधित शेतकऱ्याला ३९ हजार रुपये रोख दिले. तसेच उर्वरित ८५ हजार रुपये नंतर देण्यात येतील असे सांगितले. मात्र संबंधित शेतकऱ्यांनी वारंवार व्यापाऱ्यांकडे पैशाची मागणी केली. परंतु वर्ष उलटूनही व्यापाऱ्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे संशयित कुलकर्णी याने फसवणूक केल्याने, शेतकऱ्याने चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला. हेड कॉन्स्टेबल ओंकार सुतार हे तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...