आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगठी:सफाई कर्मचाऱ्याने परत केली पाच ग्रॅमची सापडलेली सोन्याची अंगठी

अमळनेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील वॉर्ड क्रमांक १२ मध्ये गटारीची स्वच्छता करताना पालिका सफाई कर्मचाऱ्याने पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी सापडली. संबंधित कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणे ही अंगठी महिलेला परत केली.

वार्ड क्रमांक १२ मधील मंगलादेवी चौक भागातील एका महिलेची पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी घराजवळ हरवली होती. दि.२८ रोजी नेहमीप्रमाणे सकाळी ७ ते ८ वाजेदरम्यान वाॅर्ड क्रमांक १२ मध्ये विक्की वानखेडे, विजय संदानशिव, सिद्धांत बिऱ्हाडे हे सफाई कर्मचारी, त्या महिलेच्या घराजवळील गटार साफ करण्याचे काम करत होते.

अचानक विकी वानखेडे याला गटारीत ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी सापडली. सफाईचे काम चालू असतानाच त्या घरातील महिलेने सफाई कर्मचाऱ्यांना हरविलेल्या अंगठीबाबत माहिती दिली होती. तसेच गटारीची सफाई करताना हरवलेली अंगठी सापडल्यास ती परत करावी, अशी विनवणी केली होती. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांनी सापडलेली अंगठी महिलेला परत केली. त्यामुळे अंगठी परत मिळाल्याने महिलेने सर्वांना आनंदाने चहा पाजला.

बातम्या आणखी आहेत...