आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमळनेर येथील लायन्स क्लबचा उपक्रम‎:द्रौ.रा.कन्याशाळेत झाले आरोग्य शिबिराचे आयोजन‎

अमळनेर‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील खान्देश शिक्षण मंडळ‎ संचलित द्रौ.रा.कन्याशाळेत महिला‎ दिनाचे औचित्य साधून लायन्स‎ क्लब अमळनेरतर्फे,‎ विद्यार्थिनींसाठी आरोग्यविषयक‎ शिबिराचे आयोजन करण्यात आले‎ होते. स्त्रीरोगतज्ञ डॉ.सुप्रिया‎ कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.‎ शिबिराचे आयोजन रोटरी‎ हॉलमध्ये करण्यात आले होते.‎ यावेळी लायन्सचे प्रेसिडेंट योगेश‎ मुंदडे, ट्रेझरर अनिल रायसोनी,‎ डॉ.मिलिंद नवसारीकर, शाळेचे‎ चेअरमन प्रदीप अग्रवाल,‎ मुख्याध्यापिका एस.एस.सूर्यवंशी‎ व्यासपीठावर उपस्थित होते. ३००‎ पेक्षा जास्त विद्यार्थिनी उपस्थित‎ होत्या. सूत्रसंचालन पी.पी.जोशी‎ यांनी केले. शिक्षक व शिक्षकेतर‎ कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.‎

बातम्या आणखी आहेत...