आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:तरवाडे येथील जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंदाणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळीची सुटी आटाेपून कर्तव्यावर जात असताना पाराेळा तालुक्यातील तरवाडे खुर्द येथील सीआरपीएफचे जवान यांचा रायपूर येथे प्रकृती खराब असल्याने उपचारदरम्यान मृत्यू झाल्याची घटना १ राेजी घडली.पारोळा तालुक्यातील तरवाडे खुर्द येथील संतोष बाबुलाल महाजन हे झारखंड राज्यातील राची येथे सीआरपीएफचे जवान म्हणून कार्यरत होते. दिवाळीच्या सुट्टीत ते घरी आले हाेते.

सुटी संपल्यानंतर संताेष महाजन हे कर्तव्यावर जात असताना अचानक त्याची रायपूर येथे प्रकृती बिघडली. त्यामुळे छत्तीसगढ राज्यातील रायपूर येथील जिंदाल हाॅस्पिटलमध्ये ३१ ऑक्टोबर रोजी त्यांना उपचारार्थ दाखल केले हाेते. उपचार घेत असताना १ नोव्हेंबरला रात्री १ वाजता त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. याबाबत पारोळा येथील पोलिस निरीक्षकांशी संपर्क साधला असता या वृत्ताला दुजाेरा दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...