आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिबट्या:मुंदखेडे शिवारात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद

चाळीसगाव6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील मुंदखेडे बुद्रक परिसरात गेल्या १५ दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. हा बिबट्या पशुधनाला लक्ष करीत असल्याने शेतकरी भयभीत झाले हाेते. दोन दिवसांपुर्वी बिबट्याने ज्या शेतात वासरू फस्त केले तेथेच वनविभागाने गुरूवारी सायंकाळी पिंजरा लावून त्यात बोकड ठेवला होता. बोकडाची शिकार करण्याच्या आमीषाने हा बिबट्या रात्री अलगद पिंजऱ्यात अडकला.

तालुक्यातील मुंदखेडे बुद्रूक शिवारात वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली हाेती. गेल्या तीन चार दिवसांपासून प्रकाश वामन पाटील यांच्या शेतात बिबट्याचा वावर होता. बुधवारी रात्री बिबट्याने त्यांच्या शेतातील वासरू फस्त केेले हाेते. या घटनेची माहिती वन विभागाला दिल्यानंतर वनविभागाने याच ठिकाणी, गुरूवारी सायंकाळी पिंजरा लावला होता. पिंजऱ्यात ठेवण्यासाठी पाेलिस पाटील यशवंत पाटील यांनी हा बाेकड उपलब्ध करून दिला.

माेहिमेत यांचा सहभाग या मोहिमेत सहा. वनसनरक्षक एस. के. शिसव, मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे, विवेक देसाई, वनपरिक्षेत्र अधिकारी शितल नगराळे, वनपाल जी. एस. पिंजारी यांनी ही मोहीम फत्ते केली.

बातम्या आणखी आहेत...