आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वधू-वर:पाडळसरे धरणासाठी हळदीच्या‎ मंडपात मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र‎

अमळनेर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पाडळसरे धरणाचे काम वेगाने‎ पूर्ण व्हावे यासाठी जन आंदोलन‎ समितीच्या ५१ हजार पत्र लेखन‎ आंदोलनाला उस्फूर्त प्रतिसाद मिळत‎ आहे. जानवे येथे हळदीच्या‎ समारंभात वधू-वर आणि वऱ्हाडी‎ मंडळींनीही मुख्यमंत्री,‎ उपमुख्यमंत्र्यांच्या नावे पत्र लिहून‎ आंदोलनात सहभाग नोंदवला.‎ तालुक्यातील विकासोंच्या‎ सचिवांनीही मासिक सभेत पत्र लिहून‎ आंदोलनात सहभाग नोंदवला आहे.‎

जानवेचे माजी सरपंच भटू पाटील‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ यांचे सुपूत्र शुभम पाटील व श्रीराम‎ देवरे यांची कन्या गायत्री यांनी‎ हळदीच्या कार्यक्रमात, पाडळसरे‎ धरणासाठी वेळ काढून मुख्यमंत्री,‎ उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ शिवधर्म पद्धतीने पार पडलेल्या या‎ लग्न सोहळ्यात आर.बी.पाटील,‎ वसुंधरा लांडगे यांनी विधिवत कार्य‎ पार पाडले. सोबत सामाजिक कार्यात‎ योगदानाचा आदर्श निर्माण केला.‎

बातम्या आणखी आहेत...