आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सक्तमजुरीची शिक्षा:मुलाची निर्घृण हत्या करणारी‎ आई, अन‌् एकाला जन्मठेप‎

अमळनेर‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आईचे अनैतिक संबंध पाहणाऱ्या मुलाची ‎ ‎ भाच्यासोबत मिळून निर्घृण हत्या करणाऱ्या‎ आई व एकाला अमळनेर जिल्हा न्यायालयाने ‎ ‎ जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.‎ याबाबत विस्तृत वृत्त असे की, मृत मुलाची ‎ ‎ आई गीताबाई दगडू पाटील (वय ३५) व‎ चाेपडा तालुक्यातील चहार्डी येथील मृताचा ‎ ‎ आतेभाऊ समाधान विलास पाटील (वय‎ २५) यांचे अनैतिक संबंध हाेते. दरम्यान, मृत ‎ ‎ मंगेश दगडू पाटील याने २ फेब्रुवारी २०१९ रोजी‎ या दाेघांना नकाे त्या अवस्थेत पाहिले हाेते. ‎ ‎ त्यानंतर मंगेश पाटील याने सर्व प्रकार पप्पांना ‎ ‎ सांगतो, असे त्याने आईला सांगितले.‎ त्याचवेळी गीताबाई पाटील हिने बाजूला‎ पडलेल्या काठीने मंगेशच्या डोक्यावर चार ते‎ पाच वेळा वार केले. त्यात त्याच्या डोक्याला‎ गंभीर इजा झाल्याने तो बेशुद्ध पडला. त्यानंतर‎ समाधान पाटील याने मंगेश पाटील याच्या‎ तोंडात कापडी बोळा काेंबून त्याला त्याच्या‎ घरात लपवून ठेवले. तर रात्री १२ वाजेच्या‎ सुमारास दोघांनी मृत मंगेशच्या शरीराचे तुकडे‎ केले व काही तुकडे जाळून पुरावा नष्ट‎ करण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर मंगेशचे‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अपहरण करून‎ नरबळी दिल्याचा बनावट प्रयत्न करून पुरावा‎ नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी‎ मंगेशचे वडील दगडू लोटन पाटील यांनी‎ मुलगा बेपत्ता झाल्याची पोलिस ठाण्यात‎ फिर्याद दिली होती. यात खटल्यात जळगाव‎ येथील श्वान पथकासह एपीआय मनोज‎ पवार, योगेश तांदळे यांनी प्राथमिक तपास‎ केला होता. तर पोलिस अधीक्षक सौरभ‎ अग्रवाल यांनी सखाेल चाैकशी केली हाेती.‎ १५ साक्षीदारांची तपासणी ...‎ या खटल्यात एकूण १५ साक्षीदार तपासण्यात‎ आले.

यात मृत तरुणाचे वडील दगडू लोटन‎ पाटील, बहीण प्रतिभा दगडू पाटील, प्रदीप‎ कुलदीप पाटील, डॉ. नीलेश देवराज, डॉ.‎ स्वप्नील कळसकर यांची साक्ष महत्वाची‎ ठरवली. यात जिल्हा न्यायाधीश पी. आर.‎ चौधरी यांनी दाेघांना भादंवी कलम ३०२मध्ये‎ जन्मठेप व ३०० रुपये दंड तसेच दंड न‎ भरल्यास १५ दिवस सश्रम कारावास,‎ त्याचप्रमाणे कलम २०१मध्ये दोन वर्षे‎ सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.‎

बातम्या आणखी आहेत...