आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मुस्लिम मित्राने हिंदू मित्राच्या मुलीला लग्नात भेट दिला देव्हारा, म्हणाले परमेश्वर सर्वत्र एकच

यावल2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • यावल शहरातील हाजी फारूख शेख यांचे होतेय कौतुक

यावल शहरातील जातीय सलोख्याची वीण गेल्या अनेक वर्षांपासून घट्ट आहे. काही हिंदू-मुस्लिम मित्रांनी तर अनेक वर्षांपासून कौटुंबीक सलोख्याचे संबंध जोपासले आहेत. अशा मैत्रीचा आगळावेगळा किस्सा यावलमध्ये नुकताच समोर आला. एका मुस्लिम मित्राने हिंदू मित्राच्या मुलीला लग्नात भेट म्हणून सुंदर लाकडी देव्हारा (मंदिर) भेट दिला. कुटुंबातील मुलगी जेव्हा सासरी जाते, तेथे तिला धर्म-संस्काराची जोपासना करता यावी, असा त्या मागील हेतू त्यांनी बोलून दाखवला. शहरातील सरस्वती विद्या मंदिराजवळील रहिवासी व हल्ली जळगाव येथे निवासाला असलेल्या जितेंद्र कोळी यांच्या मुलीचे लग्न होते. जितेंद्र कोळी व यावल येथील हाजी शेख फारुख हे दोन्ही मित्र आहे. त्यामुळे कोळी यांनी मित्राला लग्नाला आमंत्रित केले होते. हा विवाह समारंभ कानळदा (ता.जळगाव) येथे पार पडला. दरम्यान, मित्राची मुलगीदेखील आपल्या मुलीसमान असल्याने तिला चांगली भेटवस्तू द्यावी, असे ठरले. त्यातून हाजी शेख फारुख यांना लाकडी देव्हारा घेण्याची कल्पना सूचली. गणेश महाजन, प्रकाश बिरारी, छोटू भोई, कैलास कोळी उपस्थित होते.

धर्म कोणताही असो, धर्माचरण आवश्यक
मुस्लिम समाजामध्ये मुलीच्या लग्नात इतर साहित्यासह पवित्र कुरआन शरीफ भेट दिले जाते. नवीन कुटुंबात जाताना तेथे नियमित पवित्र कुरआन पठन व्हावे, असा त्यामागील हेतू असतो. अल्लाह, खुदा, भगवान एकच असल्याने सासरी जाणाऱ्या मित्राच्या मुलीला हिंदू रीतिरिवाजानुसार धर्माचरण करता यावे म्हणून देव्हारा भेट दिला.

बातम्या आणखी आहेत...