आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारानडुकराच्या शिकारीसाठी शेतात ठेवलेल्या फटाक्याच्या दारूच्या गाठोड्याला हात लागताच त्याचा स्फोट झाला. त्यात एका महिलेच्या हाताच्या पंजाला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी फटाक्याची दारू ठेवणाऱ्या विरूद्ध पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल झाला. जखमी महिलेवर जळगाव येथे उपचार सुरू आहेत.
या संदर्भात पाचोरा पोलिसांत लासगाव येथील श्रावण कुंभार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रावण कुंभार यांचे भाऊ विठ्ठल कुंभार यांची लासगाव शिवारात शेत गट नं. २३७मध्ये २ बिघे जमीन आहे. तसेच त्यांच्या शेताच्या बाजुलाच श्रावण कुंभार यांची ही २ बिघे शेतजमीन आहे. श्रावण कुंभार यांची सून सीमाबाई कुंभार या शेतात काम करत हाेत्या. घरातील सर्वजण ५ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास हे वीटभट्टीचे काम करत हाेते. या वेळी विठ्ठल कुंभार यांची पत्नी व सून सीमाबाई कुंभार हे शेतात कापूस वेचत हाेते. या वेळी त्यांना फटाका फुटल्यासारख्या आवाज आला. त्यामुळे सर्वजण विठ्ठल कुंभार यांच्या शेताकडे धावत गेले. त्या ठिकाणी सीमाबाई यांच्या डाव्या हातास पंजाला गंभीर इजा झाल्याचे दिसून आले. सीमाबाईंनी कापूस वेचताना एक लहान गाठोडी जमीनीवर पडलेली होती, या गाठोडीत काय आहे, ते पाहण्यासाठी उचलली असता त्याचा स्फोट झाल्याचे सांगितले. महिलेवर उपचार सुरु आहेत.
शेतात गाठोडे ठेवल्याचे संशयिताने केले कबूल कापूस वेचण्यासाठी मध्य प्रदेशातून काही लाेक आले आहेत. त्यातील गयाराम शिवरलाल चव्हाण (रा. पारदीपुराराला नंदगाव, जि. सिहोर) याला श्रावण कुंभार यांनी यापूर्वी रानडुकरे पकडताना पाहिले होते. घटनेनंतर कुंभार यांनी चव्हाण यास रानडुक्कर कसे पकडतात, असे विचारले असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याला कुंभार यांनी पकडले. याबाबत विचारले चव्हाण म्हणाला की, मीच शेतात गाठोडीत फटाक्याची दारु भरुन ठेवल्याचे सांगितले. संशयित गयाराम चव्हाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.