आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:डुकरांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या बालकाचे पाळीव कुत्र्याने वाचवले प्राण, पालिकेत वराह पालकांची बैठक

अमळनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील कलागुरू ड्रीम सिटीमध्ये अंगणात खेळणाऱ्या लहान मुलावर डुकराने हल्ला करून चावा घेत जखमी केले. तर पाळीव कुत्राने या डुकरावर हल्ला करत जखमी मुलाला त्याच्या तावडीतून सोडले. कुत्र्यामुळे हा बालक गंभीर जखमी हाेण्यापासून बचावला आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या परिसरातील रहिवाशांनी नगरपालिका व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडे परिसरातील डुकरांच्या बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात नागरिकांनी मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन देखील दिले आहे. दरम्यान, शहरातील कलागुरू ड्रीम सिटीत १ जूनला सायंकाळी सैन्य दलातील निवृत्त जवानाचा मुलगा नकूल हा अंगणात खेळत होता. त्याचवेळी परिसरात फिरणाऱ्या डुकराने त्याच्यावर हल्ला करून गालावर चावा घेतला. परंतु, त्याचवेळी त्यांच्या पाळीव कुत्र्याने डुकरावर प्रतिहल्ला करत बालकाची डुकऱ्याच्या तावडीतून सुटका केली. जर कुत्रा वेळेवर आला नसता तर डुकराने बालकास अजून जास्त चावा घेत जखमी केले असते. तर कलागुरू ड्रीम सिटी परिसरात डुकरांचा वावर वाढला आहे. दरम्यान, या विषयाबाबत वारंवार तक्रार करून देखील संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने ही घटना घडल्याचा आराेप नागरिकांनी केला आहे.

संतप्त नागरिकांचे मुख्याधिकाऱ्यांना साकडे संतप्त झालेल्या परिसरातील नागरिकांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन देऊन डुकरांच्या बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. या वेळी नरेंद्र पाटील, धीरज शिंदे, कुणाल भावसार, संजीव शिंपी, रोहित पाटील, सूर्यकांत पाटील, विजय पाटील, सुनील पाटील, ईश्वरी पाटील, विवेक पाटील, गुलाबराव वाघ, प्रवीण चव्हाण, अनिल मराठे, दीपक पाटील, वसंत चव्हाण, जयश्री पाटील, संगीता खैरनार, चुडामन पाटील आदी उपस्थित होते.

शहरातील कलागुरू ड्रीम सिटीत डुकराने चावा घेतल्याने बालक जखमी झाल्याची घटना घडली होती. त्यानुसार आज पालिकेत मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी वराह मालकांची तातडीची बैठक घेवून सर्व पाळीव वराह तत्काळ पकडण्याचे आदेश दिले आहेत. या वेळी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, स्वच्छता निरीक्षक युवराज चव्हाण, संतोष बिऱ्हाडे, वराह मालक विकी जाधव व सनी जाधव यांच्या समवेत बैठक घेवून परिसरात सोडलेली सर्व वराह लवकर पकडण्याचे आदेश दिले. १२ तासाच्या आत वराह न पकडल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे सांगितले. त्यानंतर विकी जाधव व सनी जाधव यांनी कलागुरु ड्रीम सिटी परिसरात सोडलेले सर्व वराह पकडून त्यांना बाहेरगावी रवाना केले.

बातम्या आणखी आहेत...