आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Chalisgaon
  • A Procession Of 75 Meritorious Students Of Class X, Welcome At The Crossroads And In The Rain Of Flowers; Respect For The Students To Ride The Horse In The Procession |marathi News

मानसन्मान:दहावीच्या 75 गुणवंतांची शेंदुर्णीत मिरवणूक,‎ चौकाचौकात औक्षण अन् पुष्पवर्षावात स्वागत‎; विद्यार्थिनींना मिरवणुकीत घोड्यावर बसण्याचा मान‎

शेंदुर्णी‎9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीच्या जिल्हाभरातील १५ शाखांमधील‎ दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांची,‎ शेंदुर्णीतून सोमवारी शोभायात्रा‎ काढण्यात आली. जामनेर तालुक्यात‎ प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थिनी शोभायात्रेत घोड्यावर स्वार झाल्या होत्या. मिरवणुकीत दहावीतील‎ ७५ गुणवंत विद्यार्थी सहभागी झाले.‎ पूर्वा श्रीकांत काबरा (९८ टक्के)‎ मिळवून जामनेर तालुक्यात प्रथम, तसेच ‎ ‎ ऐश्वर्या जितेंद्र गरुड हिने द्वितीय क्रमांक मिळवला. त्यामुळे दोन्ही विद्यार्थिनींची‎ घोड्यावरुन शेंदुर्णी शहरातून मिरवणूक‎ काढण्यात आली. त्यांचे सोबतच‎ शेंदुर्णी, पाळधी, वाकोद, विटनेर,‎ पळासखेडा, बेटावद, वाकडी, लोहारा,‎ तोंडापूर, वरखेडी, नांद्रा, तारखेडा,‎ वडगाव, गणपूर, मंगरूळ येथील गुणवंत‎ विद्यार्थ्यांनाही शोभायात्रेत अग्रभागी‎ संधी देण्यात आली.

विद्यार्थ्यांचे औक्षण‎ करून त्यांच्यावर चौकाचौकात‎ नागरिकांनी फुलांचा वर्षाव केला.‎ यावेळी शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे चेअरमन‎ संजय गरुड, सचिव सतीश काशीद,‎ संचालक यू.यू.पाटील, महिला‎ संचालिका उज्वला काशीद, सहसचिव‎ दीपक गरुड, वसतिगृह सचिव कैलास‎ देशमुख, शेंदुर्णी गरुड महाविद्यालयाचे‎ प्राचार्य डॉ.व्ही.आर.पाटील,‎ मुख्याध्यापक एस.पी.उदार,‎ उपमुख्याध्यापक ए.बी.ठोके, श्रीकांत‎ काबरा, विनोद पाटील उपस्थित होते.‎ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.जी. पाटील‎ यांनी केले. आभार प्रदर्शन डी. बी‎ .पाटील यांनी केले. गुणवंत विद्यार्थ्यांची‎ मिरवणूक काढल्यामुळे, पालकांनी‎ तसेच ग्रामस्थांनीदेखील या उपक्रमाचे‎ उत्स्फूर्तपणे स्वागत केले.‎

मिरवणुकीत सहभागी गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षक.‎ स्वप्न उतरले सत्यात‎ जामनेर तालुक्यातून सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थिनीचे पालक श्रीकांत काबरा यांनी‎ मनोगत व्यक्त केले. माझ्या मुलीला ९८ टक्के, तर मुलास ८६ टक्के गुण मिळाले.‎ मुलांसोबत शाळेच्या शिक्षकांचे यात योगदान आहे. मुलांची घोड्यावर मिरवणूक‎ काढून स्वप्नातला स्वर्ग शाळेने प्रत्यक्षात दाखवला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.‎

मिरवणुकीचा मार्ग असा‎ गुणवंत विद्यार्थ्यांची मिरवणूक‎ घोड्यावर बसवून वाजत-गाजत‎ नगरपंचायत प्रांगणातून सुरू झाली.‎ पहुर दरवाजा, रथ मार्गाने पाचोरा‎ नाकापर्यंत मिरवणूक गेली. त्यानंतर‎ गरुड विद्यालयात तिची सांगता झाली.‎

विद्यार्थ्यांना मिळेल प्रेरणा‎ संस्थेचे सचिव सतीश काशीद म्हणाले‎ की, शहरातील नागरिक व शाळेतील‎ शिक्षक, विद्यार्थ्यांनी केलेला‎ विद्यार्थ्यांचा सत्कार ही त्यांच्या गुणांची‎ पावती आहे. घोड्यावर मिरवणूक ही‎ विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी असल्याने‎ संस्थेने गुणवंतांची मिरवणूक काढली.‎

विद्यार्थ्यांना मिळेल प्रेरणा‎ संस्थेचे सचिव सतीश काशीद म्हणाले‎ की, शहरातील नागरिक व शाळेतील‎ शिक्षक, विद्यार्थ्यांनी केलेला‎ विद्यार्थ्यांचा सत्कार ही त्यांच्या गुणांची‎ पावती आहे. घोड्यावर मिरवणूक ही‎ विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी असल्याने‎ संस्थेने गुणवंतांची मिरवणूक काढली.‎

स्वप्न उतरले सत्यात‎ जामनेर तालुक्यातून सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थिनीचे पालक श्रीकांत काबरा यांनी‎ मनोगत व्यक्त केले. माझ्या मुलीला ९८ टक्के, तर मुलास ८६ टक्के गुण मिळाले.‎ मुलांसोबत शाळेच्या शिक्षकांचे यात योगदान आहे. मुलांची घोड्यावर मिरवणूक‎ काढून स्वप्नातला स्वर्ग शाळेने प्रत्यक्षात दाखवला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.‎

मिरवणुकीचा मार्ग असा‎ गुणवंत विद्यार्थ्यांची मिरवणूक‎ घोड्यावर बसवून वाजत-गाजत‎ नगरपंचायत प्रांगणातून सुरू झाली.‎ पहुर दरवाजा, रथ मार्गाने पाचोरा‎ नाकापर्यंत मिरवणूक गेली. त्यानंतर‎ गरुड विद्यालयात तिची सांगता झाली.‎

बातम्या आणखी आहेत...