आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधानोरा येथून गुजराथ राज्यातील प्रेरणापीठ पिराणा (अहमदाबाद) पदयात्रा उत्साहात व शेकडाे भाविकांच्या उपस्थितीत रवाना झाली. ८ मार्चला सकाळी धानोरा गावापासून सुरु झालेली ही पदयात्रा २२ मार्चला पिराणा येथे पाेहाेचेल. या पदयात्रेत सर्व समाजातील लोक सहभागी होत असल्याने येथे एकात्मतेचे दर्शन दिसून अाले. फैजपूर संस्थानचे महामंडेलेश्वर १००८ श्री स्वामी जनार्दन हरिजी महाराज यांच्या मार्गदर्शनात या पदयात्रेची सन २००९पासून सुरुवात झाली. सुरुवातीला ५ वर्ष ही पदयात्रा सुरत ते पेरणापीठ अशी होती.
या पदयात्रेत पायी चालणे तप मानले जाते. श्रद्धेने सर्व सतपंथी भक्त चालताना निष्कलंकी नारायणाचा नाम घोष करतात. तसेच सत्ससंगाचा लाभ घेतात व सतपंथी परंपरेचा, जीवनशैलीचा अंगीकार करुण सत्येचा प्रचार आणी प्रसार करत हि पदयात्रा पिराणा येथे पोहाेचते. या पदयात्रेत मुक्कामांच्या ठिकाणापासून अनेक जण जोडले जातात. पदयात्रेत दररोज सकाळी, सायंकाळी महाआरती, प्रभाती पूजा, इमामशहा महाराजांचा सत्संग होतो. अनेक भाविक पदयात्रींना स्नेहभोजन देतात. या पदयात्रेत फैजपूर, धानोरा, चोपडा, जांभोरा, शेंदुर्णी, शिरपूर, शहादा, तळोदा, कुकरमुंडा, डेडियापाडा, राजपिपला येथील भाविक जोडले जातात. या वर्षी पदयात्रेत ८० भाविकांनी सहभाग घेतला असून यात स्त्रीया, पुरुष, तरुण, तरूणी, वृद्धांचा समावेश आहे. ही पदयात्रा १५ दिवस सुरु असते.
पदयात्रेला या पदाधिकाऱ्यांचे मिळतेय सहकार्य
महामंडलेश्वर १००८ श्री स्वामी जनार्दन हरिजी महाराज, शास्त्री भक्ति किशोर महाराज, सतपंथ ज्योत मंदिर अध्यक्ष गजानन चाैधरी, सर्व संचालक, सतपंथ चारिटेबल ट्रस्टचे उपाध्याक्ष माणिकचंद महाजन, विजय मुखी, धनराज मुखी, मनोहर मुखी, ईश्वर मुखी, कमलाकर मुखी, कशेरलाल मुखी, धनराज चाैधरी तसेच धानोरा व फैजपूर येथील सतपंथ ज्योत मंदिर संस्थानचे सर्व कार्यकर्त्यांचे यासाठी सहकार्य लाभते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.