आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅग लांबवली:निवृत्ताची 35 हजार रुपये असलेली बॅग लांबवली, पारोळा शहरातील घटना

पारोळाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील ७६ वर्षीय वृद्धाची ३५ हजार रुपये असलेली बॅग, स्टेट बँकेच्या बाहेरून चोरांनी लांबवली. ही घटना दि.१ रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. धुळे जिल्हा सिव्हिल हॉस्पिटलचे निवृत्त सुपरवायझर गोकुळ माधवराव आढाव हे पारोळा येथील स्टेट बँकेत त्यांचे पेन्शन काढण्यासाठी गेले होते. त्यांनी खात्यातून ३० हजार रुपये काढून आपल्या बॅगेत ठेवले. त्यांच्याकडे आधीचे पाच हजार रुपये व एटीएम बॅगेत होते. ही बॅग दुचाकीचे लॉक उघडण्यापुर्वी त्यांनी सीटवर ठेवली होती.

टोपी घातलेल्या तरुणाने ही बॅग लंपास केल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. याबाबत पारोळा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजआधारे पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरू केला आहे. नागरिकांनी बँकेतून पैसे काढल्यानंतर सतर्कता बाळगावी, रोकड सुरक्षित ठेवावी, ज्येष्ठ नागरिकांनी कुटुंबातील व्यक्तीला सोबत आणावे, असे आवाहन केले.

बातम्या आणखी आहेत...