आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनावश्यक वस्तूंच्या‎ वाढल्या किंमती:महागाई, बेरोजगारी विरोधात पाचाेऱ्यात वंचित आघाडीचे निवेदन‎

पाचोरा‎9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरगुती व व्यावसायिक गॅस‎ सिलिंडर, जीवनावश्यक वस्तूंच्या‎ वाढलेल्या किंमती, दिवसेंदिवस‎ वाढणाऱ्या बेरोजगारी विरोधात‎ तसेच शेतकऱ्यांच्या कापसाला १२‎ हजार रुपये हमीभाव मिळावा, या‎ मागण्यांसाठी वंचित बहुजन‎ आघाडीच्या वतीने १३ मार्चला प्रांत‎ अधिकाऱ्यांसह तहसीलदारांना‎ निवेदन सादर करण्यात आले. दाेन‎ दिवसात विचार न केल्यास १६‎ मार्चला आंदाेलनाचा इशारा‎ निवेदनात देण्यात आला आहे.‎ वंचित बहुजन आघाडीच्या‎ जिल्हाध्यक्षा संगीता साळुंखे व‎ वंचित बहुजन आघाडीचे मा.‎ तालुकाध्यक्ष अनिल लोंढे यांच्या‎ नेतृत्वात १३ मार्चला उपविभागीय‎ अधिकारी डॉ. विक्रम बांदल,‎ तहसीलदार कैलास चावडे व‎ पाचोरा येथील पोलिस प्रशासनाला‎ हे निवेदन देण्यात आले.

निवेदन‎ देताना वंचित बहुजन महिला‎ आघाडीच्या जिल्हाध्यक्षा साळुंखे,‎ मा. तालुकाध्यक्ष लोंढे यांच्यासह‎ उपाध्यक्षा संजीवनी रत्नपारखी,‎ सचिव लता सपकाळे, पौर्णिमा‎ सोनवणे, कांता कदम, आशा‎ ब्राम्हणे, रत्ना खरे, पाचोरा तालुका‎ महासचिव सुनील कदम,‎ नगरदेवळा शहराध्यक्ष किरण‎ निकम, उपाध्यक्ष रवी पवार, गट‎ प्रमुख जयदेव बागुल, उपगट प्रमुख‎ वाल्मीक पवार, माजी तालुका‎ महासचिव सुनील सुरडकर आदी‎ उपस्थित होते. आगामी दोन‎ दिवसात निवेदनाचा योग्य विचार न‎ झाल्यास वंचित बहुजन‎ आघाडीतर्फे १६ मार्चला लोकशाही‎ मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा‎ इशारा ही या निवेदनाद्वारे प्रशासनास‎ देण्यात आला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...