आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोक्याची घंटा:दाेन दिवसांपूर्वी ट्रक-दुचाकी अपघातात विद्यार्थिनीचा झाला हाेता मृत्यू; नियम पाळण्याची गरज

उमेश बर्गे | चाळीसगाव14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील रस्त्यांवर लहान मुले सर्रास दुचाकी चालवताना दिसत आहेत. यातून पालकांकडून पाल्यांचे लाड पुरवले जात असले तरी या कृतीतून ते एक प्रकारे आपल्या मुलांना धाेकेदायक वाटेवरच पाठवत आहेत. दाेन दिवसांपूर्वी शहरातील धुळे राेडवर नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने तिचा ट्रकखाली आल्याने मृत्यू झाला हाेता.

ही घटना पालकांसाठी एक प्रकारे धाेक्याची घंटा असून पालकांनी वेळीच जागरूक हाेण्याची गरज आहे. आपल्या देशात वाहन चालवण्यासाठी मोटार वाहन कायद्यानुसार काही नियम आहेत. परंतु, असे असूनही शहरात अल्पवयीन मुले सर्रास वाहन चालवताना दिसतात. पालकांनी वाहन दिल्यानंतर या मुलांना वाहन चालवताना वेगाचे भान राहत नाही. ही लहान मुले रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहने चालवताना िदसतात. रस्त्यावरच काय तर शहरातील गल्ली बाेळात ही मुले वाहन भरधाव वेगाने चालवत असतात. अगदी हाकेच्या अंतरावर जायचे असेल तरी मुलांना दुचाकी लागते, असे चित्र घराघरात दिसत आहे. मोबाइलवर बोलताना वाहन चालवने, वाहतुक नियमांचे पालन या बालकांकडून होत नाही.

पालकांनी सजग हाेण्याची गरज
शिकवणी आटोपून दुचाकीने घराकडे जाणाऱ्या नववीच्या विद्यार्थिनीला ट्रकने चिरडल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी धुळे रोडवर घडली हाेती. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याने हा विषय ऐरणीवर आला आहे. चाळीसगाव शहरात ही घटना घडल्याने पालकांसाठी ही एक धोक्याची घंटा असून पालकांनी वेळीच सजग हाेण्याची गरज आहे.

उच्चभ्रू, सुशिक्षितांचा बेजबाबदारपणा
लहान मुलांना वाहन देण्यात उच्चभ्रू, सुशिक्षित पालक पुढे असल्याचे दिसून येते. लाड, वेळे अभावी वा अन्य कारणांनी या पालकांकडून आपल्या पाल्याच्या हातात वाहन दिले जाते. परंतु, बालकांच्या गाडी चालवण्यामुळे अपघात झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित बालकाच्या पालकांची असते, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. अगाेदरच शहरातील रस्ते वाहन चालवण्यायाेग्य राहिलेले नाहीत.

पोलिसांकडून दुर्लक्ष
परवाना नसतानाही अल्पवयीन मुले सर्रास दुचाकी चालवतात. त्यांना हटकण्यापलीकडे पोलिस काहिही करत नाहीत. कारवाई होत नसल्याने पालकांसाेबत मुलांचीही हिंमत वाढली आहे. परिणामी छोट्या-मोठ्या अपघातांची संख्या वाढत आहे.

मुलांना देऊ नका गाडी
विनापरवाना वाहन चालवणे गुन्हा असून पालकांनी मुलांना वाहनांऐवजी सायकल द्यावी. याबाबत पाेलिस प्रशासनातर्फे जागृती केली जात आहे. तर शहरात अवजड वाहने येवू नयेत, यासाठी पालिकेसाेबत धुळे व कन्नड राेडवर बॅरेकेटींग करणार.रमेश चाेपडे, अप्पर पाेलिस अधीक्षक

बातम्या आणखी आहेत...