आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कष्टाचे चीज:शिक्षक अन‌् इंजिनिअर पिता- पुत्रांनी गुढ्यात फुलवला ड्रॅगन फ्रूटचा मळा

अजय कोतकर | चाळीसगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गुढे येथील प्राथमिक शिक्षक सुभाष माळी व त्यांचे दोन्ही इंजिनिअर मुले वैभव व दिनेश माळी यांनी पारंपरिक शेती व्यवसायात होत असलेला बदल पाहता आपल्या शेतात २० गुंठयात अनोखा प्रयोग केला. त्यांनी ड्रॅगन फ्रूटचा मळा फुलवून साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न घेऊन शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे.

सुभाष माळी यांनी दोन्ही मुलांचे उच्च शिक्षण पूर्ण केले असून या दोन्ही मुलांना सोबत घेऊनच त्यांनी पारंपरिक शेतीबरोबर आपल्या गुढे शेतात ड्रॅगन फ्रूट फुलवला. यासाठी वैभव व दिनेश माळी यांनी उस्मानाबाद येथे जाऊन ड्रॅगन फ्रुट फळांबाबत माहिती घेतली. जानेवारी २०२०ला आपल्या शेतातील २० गुंठ्यात ६ बाय १० अंतरावर सिमेंटचे पोल व सिमेंट रिंग टाकून त्यासाठी व्यवस्था करुन ड्रॅगन फ्रुटची लागवड केली. काटेरी सांबर-कांड्या सारखे दिसणारे हे झाड असते, त्याला ही फळे येतात.

या फळ-बागेसाठी लागणारे उष्ण वातावरण आपल्याकडे नैसर्गिक असल्याने त्यांनी या परिसरात हा मळा फुलवण्याचे धाडस केले. ठिबक सिंचन व शेणखत देऊन अंतर्गत मशागत तसेच देखभाल व पाण्याचे योग्य नियोजन केली. तर लागवडीनंतर १८ महिन्यात या बागेत जुलै ते जानेवारी असा फळ-बहार येण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला अल्प फळे अाली. नवीन फळांची स्थानिक बाजारपेठ विक्री करून २० गुंठयात अवघ्या १८ महिन्यात साडेतीन लाखाचे उत्पन्न घेतले.

ज्ञानदानाबराेबरच अाजही परिवारासाेबत शेतात राबतात
भालकर (माळी) परिवार गावात व परिसरात बागाईत, फळबागाईत, भाजीपाला याबरोबरच लिंबू, पेरू, आंबा, पपई व रोपे, कलम आदी शेतीसाठी प्रसिद्ध आहे. स्वर्गीय अंकुश रामा माळी यांचे चिरंजीव सुभाष अंकुश माळी हे शिक्षक असले तरी ते हाडाचे शेतकरी आहेत. ज्ञान-दानाच्या कामाबरोबरच उर्वरित वेळात त्यांचे व कुंटुबाचे हात अाजही शेतात राबतात.

२० वर्षांपर्यंत घेता येथे फळांचे उत्पादन
इच्छा असेल तर मार्ग दिसेल, असा मूलमंत्र या शिक्षक व इंजिनिअर पिता-पुत्रांनी यशस्वी ठरवला आहे. साधारण लागवडीसाठी सुरुवातीला एकरी तीन लाख रुपये खर्च अपेक्षित असतो. या नवीन फळ बागाची काळजी, नियोजन केले, तर ही बाग २० वर्ष आपल्या फळे देते, अशी माहिती दिनेश सुभाष महाजन यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. या नवीन प्रयाेगात ते यशस्वी झाले असून त्यांच्या या धाडस व प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बातम्या आणखी आहेत...