आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजस्थानातून १६ लाखांची महिंद्रा थार कार चोरून महाराष्ट्रात आलेल्या चोरट्याला अमळनेर पोलिसांनी, शनिवारी रात्री गुप्त माहितीवरून अटक केली. शहरातील स्टेट बँकेजवळ शनिवारी रात्री ही कारवाई झाली.
शनिवारी रात्री पोलिस कर्मचारी मिलिंद भामरे, सुर्यकांत साळुंके व कपील पाटील हे पेट्रोलिंग करत होते. त्याचवेळी पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांना गुप्त बातमीदारा मार्फत संशयिताची माहिती मिळाली. संशयित परबतसिंग मदनसिंग भाटी (रा.दहीफडा खिच्या, ता.लोणी झवर, जि.जोधपूर, राजस्थान) हा सुभाष चौकातून रेल्वे स्टेशनकडे जात होता. त्याला गस्तीवरील पथकाने ताब्यात घेतले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
पोलिसांनी थेट पोलिस ठाण्यात आणून त्याला खाक्या दाखवला. त्यावेळी त्याने सर्व हकीकत पोलिसांसमोर कथन केली. अमळनेर पोलिसांनी राजस्थान पोलिसांशी संपर्क साधून चोरट्याची माहिती कळवली. त्यानुसार अटकेतील संशयित अट्टल वाहन चोर असल्याचे समोर आले. सोमवारी राजस्थान पोलिसांचे पथक अमळनेरात आले होते. त्या पथकाने संशयिताला ताब्यात घेतले. त्यानंत हे पथक पुन्हा राजस्थानकडे रवाना झाले. राजस्थानातून पसार झालेल्या चोरट्याला अटक केल्याने, पोलिसांचे कौतुक झाले.
मध्य प्रदेशात महू येथे लपवली चोरलेली कार
संशयित भाटीविरुद्ध ५ डिसेंबरला कलम ३७९ प्रमाणे राजस्थानमधील झवर पोलिस ठाण्यात महिंद्रा थार (क्र.आर.जे.१०-सी-००६१) ही गाडी चोरल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. संशयिताने कारच्या नंबरप्लेटवर गोवा पासिंगचा बनावट क्रमांक टाकून तो कार घेऊन महाराष्ट्रात आला होता. तसेच चोरीनंतर त्याने स्वत:चा मोबाईल बंद केला होता. याबाबत पोलिसांनी चौकशी केली असता, चोरी केलेली कार मध्यप्रदेशातील महू येथे लपवल्याचे त्याने सांगितले. ही कारही पोलिस ताब्यात घेणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.