आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रकची धडक:दुचाकीला मागून ट्रकची धडक, कृषी पर्यवेक्षकाचा जागीच मृत्यू

चोपडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील दोंदवाडे येथील रहिवासी व कृषी पर्यवेक्षक मनोहर फकीरा पाटील (वय ५२) यांचे १ रोजी अपघाती निधन झाले. चोपडा-यावल रस्त्यावर हा अपघात झाला.मंगळवारी सायंकाळी पाच वाजता पाटील हे आपल्या दुचाकीने (क्र.एम.एच.१९-बी.एल.०१५४)जळगावला गेले होते. तेथून ते चोपड्याला घरी परत येत होते. वाटेत मागून भरधाव येणाऱ्या ट्रकने (एम.एच.१९-सी.डब्लू.९२७५) त्यांना धडक दिली.

अपघातात ट्रकचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. मनोहर पाटील हे अत्यंत प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी होते. अपघाताचे वृत्त कळताच त्यांचे सहकारी, मित्र व नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. चोसाकाचे माजी चेअरमन अॅड.घनश्याम पाटील, प्रदीप पाटील, सुनील महाजन, प्रा.शरद पाटील, एस.आर.पाटील, मोहन चौधरी उपस्थित होते. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे. रात्री नऊ वाजता चोपड्यात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. याप्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. अपघातग्रस्त वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. घटनेमुळे चोपडा शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

मुलगा जाणार होता कोट्याला
मनोहर पाटील यांचा मुलगा देवांश हा मंगळवारी पुढील शिक्षणासाठी कोट्याला जाणार होता. तो घरी वडीलांची प्रतीक्षा करत होता. मात्र, त्यांना येण्यास विलंब झाल्याने त्याने कोट्याला जाणे रद्द केले होते. पाटील यांची मुलगी इंदूर येथे नोकरीला आहे.

बातम्या आणखी आहेत...