आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजामनेर ते फत्तेपूर रस्त्यावरील वळणे अपघातास कारणीभूत ठरत आहेत. बुधवारी रात्री शहापूरजवळ उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला आयशरने जबर धडक दिली. या अपघातात ट्रॅक्टरवरील चालकासह एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. शहापूर गावाबाहेर तळेगाव कडे जाणाऱ्या कॉर्नरजवळ उकिरडा भरण्यासाठी बुधवारी रात्री ११.३० वाजेदरम्यान रस्त्याच्या कडेला ट्रॅक्टर लावला होता. त्याचवेळी फत्तेपूर कडून भरधाव वेगाने आलेला आयशर ट्रक (एमएच- ४६, इ २१७१) चालकाला नियंत्रित करता आला नाही.
हा ट्रक थेट रस्त्याच्या कडेला शेणखत भरण्यासाठी उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला जाऊन धडकला. या अपघातात ट्रॅक्टर चालक राहुल रघुनाथ धनगर व खत भरण्यासाठी आलेला महादू भिकारी भोई हे दोघे जण जखमी झाले आहेत. या दोघा जखमींना तातडीने जळगाव येथे उपचारासाठी हलवण्यात आले.
फत्तेपूर रस्ता धोकादायक ...
जामनेर ते फत्तेपूर रस्ता चांगला असल्याने वाहने सुसाट चालवणाऱ्या चालकांचे वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटते. त्यामुळे काही दिवसात जामनेर ते फत्तेपूर रस्त्यावर अपघातांची संख्या वाढली आहे. रस्त्यावरील वळणे कमी करावीत, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.