आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव:पाचोरा येथे घडले ऐक्याचे दर्शन

पाचोराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील भुयारीचा राजा या गणेश मंडळाच्या गणेशाची मुस्लिम समाजातील व्यावसायिक फारुख शाह यांनी आरती करुन मंडळांना सामाजिक एकतेचा संदेश दिला.शहरातील सांडू भाऊराव शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या “भुयारीचा राजा’ या गणपतीची फारुख शाह यांनी आरती केली. भुयारीचा राजा या मंडळाचे हे चौथे वर्षं असून हे मंडळ प्रत्येक वर्षी समाजोपयोगी कार्य करत असते, असेही त्यांनी सांगितले.

या आरतीसाठी फारुख शाह यांच्यासह शरद वाघ, पवन प्रजापात, योगेश सोनवणे, रवींद्र पाटील, संदीप परदेशी, योगेश पाटील, गणेश रावळ, भावेश राजपूत, महेश पाटील, मानव नीलेश कोळी, मनोज सैंदाणे यांच्यासह भाविक माेठ्या संख्येने उपस्थित होते. शाह म्हणाले की, माझ्यासाठी लहानपणापासून गणेशोत्सव हा आनंदाचा क्षण राहिला आहे.

बातम्या आणखी आहेत...