आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:अपघातात मंगरूळ येथील तरुणाचा मृत्यू

पाराेळा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील मंगरुळ येथील तीन जण दुचाकीने धानाेरे येथे लग्नाला गेले हाेते. लग्न आटाेपल्यानंतर घरी परत येताना जांभाेरा गावाजवळ सुरु असलेल्या पुलाच्या कामाच्या ठिकाणी दुचाकी घसरल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. तर अन्य दाेन जण या अपघातात जखमी झाले आहेत.

मंगरूळ येथील तीन जण एका दुचाकीवर पारोळाकडे येत हाेते. दरम्यान, धरणगाव रस्त्यावरील जांभोरा गावाजवळ फरशी पुलाचे काम सुरू आहे. या ठिकाणी दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात जयवंत गोरख पाटील (वय २८) यांचा जागीच मृत्यू झाला. तर श्याम भास्कर पाटील, शुभम शिंदे हे जखमी झाले आहेत. याबाबत सुनील पांडुरंग पाटील (रा. मंगरूळ) यांनी पारोळा पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, श्याम भास्कर पाटील हा दुचाकी (एमएच- १९, डीडब्ल्यू- ५७८७)ने धरणगाव तालुक्यातील धानोरे येथे मित्राच्या हळदीचा कार्यक्रमाला गेला हाेता. हळदीचा कार्यक्रम आटाेल्यानंतर रात्री ११.३० वाजेच्या सुमारास ते मंगरूळकडे निघाले.

जांभोरा गावाजवळून जाताना फरशी पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी त्यांची दुचाकी घसरून जयवंत पाटील हे पुलाच्या कठड्यावर फेकला गेल्याने त्यांच्या डोक्यास, हातापायास गंभीर इजा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या अपघातात जयवंत पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने मंगरुळसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...