आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्मविश्वास:शिंदाड येथील तरुणाने अपंगत्वावर मात करत सुरू केले फिरते व्यवसाय केंद्र

पिंपळगाव हरेश्वर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील युवक दोन्ही पायांनी दिव्यांग असलेल्या तरुणाने फिरते व्यवसाय केंद्र सुरु केले आहे.आतापर्यंत दुसऱ्याकडे मजुरी करणारा, मजबुरीचे जीवन जगणाऱ्या परमेश्वर पाटील या तरुणाने स्वतःच्या आत्मविश्वासाच्या जोरावर दुचाकीच्या साहाय्याने फिरते व्यवसाय केंद्र सुरु केले आहे. सद्या आपल्याकडे जाहिरात करण्याचे असंख्य पर्याय उपलब्ध असले तरी खेड्यात हे फिरते जाहिरात केंद्र प्रभावी व आकर्षक ठरत आहे.

कमी खर्चात आपल्या व्यवसायाची जाहिरात ही शेवटच्या घटकापर्यंत प्रभाव टाकू शकते, हे यातून दिसून आले आहे. बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या परमेश्वर पाटील यांच्या मदतीला त्यांचे शिंदाड येथील दिव्यांग मित्र भागवत पाटील हे नेहमी तयार असतात. हे दाेन्ही मित्र दुचाकीवर दिवसभर फिरुन आपल्यासह आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...