आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्दैवी मृत्यू:रेल्वेतून पडल्याने उत्तर प्रदेशातील तरुणाचा मृत्यू

पाचोरा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील परधाडे ते माहेजी रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या रेल्वेतून पडल्याने उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथील ३५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ६ ऑगस्टला दुपारी १ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथील चंदू लच्छीराम गुप्ता (वय ३५) हा तरुण ६ ऑगस्टला कल्याणहून वाराणसी येथे जाण्यासाठी रेल्वेत बसला हाेता. दुपारी १ वाजेच्या सुमारास परधाडे ते माहेजी रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या रेल्वेतून डाऊन ट्रकवर पडल्याने चंदू गुप्ता याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर चंदू गुप्ता याचा मृतदेह रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक तुषार विसपुते करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...