आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:चोपडा-शिरपूर रस्त्यावर कारचे टायर फुटल्याने सिल्लोड तालुक्यातील तरुण ठार; एक गंभीर

चोपडा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथील डॉक्टर व मेडिकल चालक हे आपल्या मित्राच्या लग्नाला शिरपूर येथे गेले होते. दुपारी लग्न आटोपून शिरपूरहून चोपड्याकडे येताना अकुलखेडा जवळील पुलावर अचानक कारचे टायर फुटून गाडीतील एक जण जागीच ठार तर चालक गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली.

उंडणगाव येथील डॉ. ज्ञानेश्वर रामदास पाटील (वय ५०) हे त्यांच्या सोबत असलेल्या फार्मासिस्ट मधुकर ईश्वर धनमई (वय ३१) हे मित्राचा लग्नानिमित्त शिरपूर येथे आले होते. दुपारी लग्न आटोपून ते कार (एमएच- २०, ईई- ३२९५)ने शिरपूरहून चोपड्याकडे येत होते. शिरपूर रस्त्यावरील काझीपुरा फाट्याच्या नजीक पुलाचे काम सुरू असून त्या पुलावरून गाडी जाण्याच्या अगोदरच त्यांच्या कारचे टायर फुटून ही गाडी पुढे पुलाचा कठड्याला ठोकली गेल्याची घटना दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.

या गाडीचा बलून (एअर बॅग) चालकाच्या बाजूने बसलेल्या मधुकर ईश्वर धनमई यांना जोरात लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर या अपघातात डॉ. ज्ञानेश्वर रामदास पाटील हे गंभीर जखमी झाले.

बातम्या आणखी आहेत...