आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्ष लागवड मोहिमेस प्रारंभ:एक हजार वृक्ष संगोपनाची स्वीकारली जबाबदारी

जामनेर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामनेर पालिकेतर्फे नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते शहरात वृक्ष लागवड मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. तर लागवड केलेल्या एक हजार वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी पालिकेतील गटनेते डॉ. प्रशांत भोंडे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी घेतली.

‘जामनेर शहर, हरित शहर’ करण्यासाठी पालिकेतर्फे शहरातील खुले भूखंड, रस्त्याच्या कडेसह सोनबर्डी व उपलब्ध असलेल्या जागांवर वृक्ष लागवड मोहीम राबवली जात आहे. आनंद नगर, मनिली इस्टेट, शिवाजी नगर, शिव कॉलनी, हिवरखेडा रोड या परिसरात पालिकेतील गटनेते प्रशांत भोंडे यांनी एक हजार वृक्ष लागवड करून कॉलनीवासीयांच्या सहकार्याने संगोपनाची जबाबदारी स्वीकारली आहे. नगराध्यक्षा साधना महाजन यांनी वृक्ष लागवडीचा शुभारंभ केला. या वेळी नगरसेविका ज्योती पाटील, नगरसेवक आतीष झाल्टे, संध्या पाटील, शीतल सोनवणे, व अनेक नागरिक, कार्यकर्ते हजर होते.

बातम्या आणखी आहेत...