आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहनाचे माेठे नुकसान:वाघळीजवळ सिलिंडर नेणाऱ्या ट्रकचा अपघात

चाळीसगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भडगाव रस्त्यावरुन रिकामे सिलिंडर घेऊन चाळीसगावकडे येणारा ट्रक व क्रेनची समोरसमोर धडक होवून सिलिंडर नेणाऱ्या ट्रकचे चालक व क्लिनर जबर जखमी झाल्याची घटना दुपारी २ वाजेच्या सुमारास वाघळी गावाजवळ घडली.वाघळी गावाजवळ यु-टर्नवर वाघळीकडून चाळीसगाककडे एक ट्रक रिकामे सिलिंडर घेऊन येत हाेता. या वेळी हा ट्रक व चाळीसगावहून वाघळीकडे जाणाऱ्या क्रेनची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी जबर होती की ट्रक क्रेनच्या धडकेने रस्त्यावर उलटला व त्यातील सिलिंडर रस्त्यावर विखुरले. सिलिंडर असलेल्या वाहनाचे माेठे नुकसान झाले असून चालक व क्लिनर जखमी झाले आहेत.

अपघात झाल्याचे वृत्त कळताच वाघळी येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन रिकामे रस्त्यावर पडलेले सिलिंडर बाजुला करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केली. तसेच जखमी चालक व क्लिनर यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी सायंकाळपर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता.सुदैवाने सिलिंडर रिकामे असल्याने अनर्थ टळला.

बातम्या आणखी आहेत...