आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षा:खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेपेची झाली शिक्षा; या प्रकरणात न्यायाधीश एस. बी. गायधनी यांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे

अमळनेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील सात महिन्यांपूर्वी चाऱ्याचा कुड जाळल्यावरून झालेला भांडणाचा राग मनात धरून मारहाण करणाऱ्या तरुणाच्या वार करून हत्या करणाऱ्या एकाला अमळनेर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

चाेपडा तालुक्यातील देवझरी येथील मूळ रहिवासी व हल्ली धानोरा येथे राहणाऱ्या आरोपी पिंटू पिरत्या पावरा याने सात महिन्यांपूर्वी गावात चाऱ्याचा कुड जाळला होता. त्यावरून त्यास ग्रामस्थांनी मारहाण केली होती. मारहाण करणाऱ्या ग्रामस्थांमध्ये मृत दीपक बाजऱ्या पावरा याचाही समावेश होता.

हाच राग मनात धरून पिंटू पावरा याने मृत दीपकला ९ जून २०१९ रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास खून केला होता. या खटल्यात एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. यात सरकारी वकील किशोर बागुल यांनी युक्तिवाद केला. या प्रकरणात न्यायाधीश एस. बी. गायधनी यांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे

बातम्या आणखी आहेत...