आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहावितरणच्या कासोदा कक्षाअंतर्गत आडगाव येथे महावितरणच्या एरंडोल उपविभागाने, गुरुवारी ७० वीजचोरांवर धडक कारवाई केली. संबंधितांच्या मीटरची तपासणी केल्यानंतर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. आडगावात रोहित्र जळणे, वारंवार वीजपुरवठा खंडित होणे असे प्रकार वाढले होते. त्यामुळे कासोदा उपकेंद्रावर ग्राहकांच्या वारंवार तक्रारी येत होत्या. तसेच सदर फिडरच्या वीजगळतीमध्येही वाढ झाली होती.
त्यामुळे एरंडोल उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत इंगळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व अभियंते व कर्मचाऱ्यांनी तीन पथकांद्वारे आडगावात तपासणी केली. गावातील एकूण २१५ घरगुती आणि वाणिज्य ग्राहकांची वीजजोडणी तपासली. मीटरमध्ये छेडछाड, अनधिकृत वीजपुरवठा, घरगुती जोडणी असताना व्यवसायिक वापर असे प्रकार आढळले. कासोदा कक्षाचे सहाय्यक अभियंता राहुल पाटील, एरंडोल शहर कक्षाचे सहाय्यक अभियंता पी.एस.महाजन, जयदिपसिंग पाटील, मनोहर पाटील, आदींनी सहभाग नोंदवला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.