आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वागत:अमळनेरकरांकडून कारवाईचे स्वागत; झोपड्या, ओटे अन‌् शेड तोडले

अमळनेर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर परिषदेच्या शासकीय व्यापारी संकुलामधील जुगार अड्ड्यांसह अवैध व्यवसाय पालिकेच्या पथकाने कारवाई करुन नेस्तनाबूत केले. अमळनेर शहरातील शासकीय संकुलातील अवैध व्यावसायिकांनी अतिक्रमण करून तेथे मद्य, मटका, जुगार सुरू केले होते. मच्छी बाजारात सट्टा पेढ्यांची संख्या जास्त होती. साने गुरुजी मार्केटमध्ये ही जिन्याखाली अतिक्रमण करून जुगार खेळवला जात होता.

त्यामुळे मच्छी मार्केटमध्ये नागरिकांसह महिलांना वेगवेगळ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. हे धंदे बंद करावेत, अशी अनेक दिवसांपासून मागणी नागरिकांनी मागणी केली होती. प्रशासक सीमा अहिरे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी पालिकेच्या मालमत्तेच्या आवारातील अवैध धंदे बंद करण्याचा निर्णय घेतला. अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल, अविनाश बिऱ्हाडे, जगदीश बिऱ्हाडे, यश लोहरे, विशाल सपकाळे, जयदित्य गजरे, सुरेश चव्हाण, भूषण चव्हाण, विकास बिऱ्हाडे, रफिक खान, जितेंद्र चावरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...