आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कासोदा येथील सार्वजनिक गणेश मित्र मंडळाचा उपक्रम

कासोदाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील गणपती मंदिराजवळील सार्वजनिक गणेश मित्र मंडळातर्फे दरवर्षी गणेशोत्सवात आनंद मेळाव्याचे आयोजन केले जाते. गणपती बाप्पाची स्थापना झाल्यानंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी मंडळातर्फे आनंद मेळावा घेतला जातो. त्याप्रमाणे ४ रोजी हा उपक्रम पार पडलाय त्यात खवय्यांनी भजी, कचोरी, भेळ समोसा, डोसा अशा खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. त्यासोबतच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दरवर्षाप्रमाणे यंदा रक्तदान शिबिर घेण्याचेही नियोजन केले आहे.

कासोदा येथे मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सार्वजनिक गणेश मित्र मंडळातर्फे, गणेशोत्सवात विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. यावर्षी गावातील महिला मंडळासह बालगोपाळांसह भाविकांनी आनंद मेळाव्याचा लाभ घेतला. दरवर्षी महिला आनंदमेळाव्याचे नियोजन अतिशय उत्साहाने करतात. यात माहेश्वरी पंच मंडळाने अनमोल सहकार्य केले. तर सदर आनंद मेळावा यशस्वी पार पाडण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष तुषार मंत्री, उपाध्यक्ष गणेश सोमाणी, खजिनदार स्नेहल बाहेती, आशिष समदाणी, गोपाल पांडे, शैलेश मंत्री, कैलास सोमाणी, सुनील झंवर, पंकज बियाणी, पुनेश मंत्री, आशिष बियाणी यांनी परिश्रम घेतले.

स्वयंरोजगाराला चालना दरवर्षी सार्वजनिक गणेश मित्र मंडळातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या आनंद मेळाव्यात, महिलांना आपल्या पाककृती सादर करण्याची संधी मिळते. या माध्यमातून महिलांच्या पाककलेस हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होते. तसेच विविध पाककृतींना खवय्यांची पसंती मिळते. याच माध्यमातून अनेक महिलांना स्वयंरोजगाराची वाट सापडली आहे.

बातम्या आणखी आहेत...