आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागतिक महिला दिनानिमित्त पारोळा पोलिस स्टेशनचे निरीक्षक रामदास वाकोडे यांनी, महिला दक्षता समिती सदस्या व महिला पोलिस पाटलांकडे एक दिवसासाठी पोलिस ठाण्याचा पदभार सोपवला. पोलिस ठाण्यात महिलांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पोलिस निरीक्षक म्हणून अॅड.कृतिका आफ्रे, ठाणे अंमलदार नलिनी पाटील, सहाययक ठाणे अंमलदार सुनंदा शेंडे, ज्योती पाटील, उषा पाटील, वायरलेस ड्युटी वैशाली पाटील, कारकून ललित पाटील, क्राईम माया सरदार, सीमा पाटील, बारनीशी रुपाली पाटील, ज्योत्स्ना पाटील, पासपोर्ट शीतल पाटील, गायत्री पाटील, तामसवाडी बिट शोभा पाटील, शीतल पाटील बहादरपूर बिट जयश्री साळी, टाऊन बिट कल्पना पाटील, राजवड बिट सुरेखा पाटील, डीबी पथक अन्नपूर्णा पाटील, पूजा पाटील, पूनम पाटील, सरोज परदेशी यांनी कामकाज सांभाळले. पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, राजू जाधव, शेखर डोमाले, इकबाल शेख, पोलिस नाईक गजरे, कॉन्स्टेबल मोहसीन, पगारे यांनी सहकार्य केले.
घरगुती वाद मिटवला पोलिस कर्मचाऱ्यांनी महिलांना कामकाजाबाबत मार्गदर्शन केले. यादरम्यान बारीवीची परीक्षा सुरू असल्याने एनईएस हायस्कूलच्या बाहेर महिलांनी बंदोबस्तही सांभाळला. घरगुती वादाची दोन प्रकरणे महिलांनी हाताळली. दोन्ही प्रकरणात पोलिस निरीक्षक वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाद मिटवण्यात यश आले. पोलिसांचे कामकाज हाताळणे वेगळा अनुभव असल्याची प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.