आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेजचा 100 टक्के निकाल

चाळीसगाव14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी (डी. फार्मसी)कॉलेजमधील औषध निर्माण शास्त्र अभ्यासक्रमाच्या महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाची (एमएसबीटीइ) प्रथम व द्वितीय वर्षाचा उन्हाळी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यात आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले.

प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष डी.फार्मसीचा १०० टक्के निकाल लागला आहे. यात प्रथम वर्षातील विद्यार्थिनी पायल पाटील हिने ६८.९० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक, अरविंद गवई याने ६६.८० टक्के मिळवून द्वितीय क्रमांक तर नंदिनी पवार हिने ६५.८० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. तसेच द्वितीय वर्षाचा विद्यार्थी चेतन चव्हाण याने ७९.९० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक, अस्मिता महाजन हिने ७९.५० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर वेदांत मुट्टेपवार याने ७८.९० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावत यश संपादित केले आहे. सर्व गुणवंतांचे सर्वत्र काैतुक हाेत आहे.

बातम्या आणखी आहेत...