आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 गुन्ह्यांची दिली कबुली:आदित्य ठाकरेंच्या सभेत पाकीट अन‌ माेबाइल चोरणाऱ्यास घेतले ताब्यात ; पाराेळा पाेलिसांची दुसऱ्याच दिवशी कारवाई

पारोळा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या रॅलीत मालेगाव येथील चोरट्याने ११ जणांचे रोख रुपयांसह मोबाइल असा एकूण ९२ हजाराचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी पारोळा पोलिसांनी आज तपास चक्रे फिरवत चाेरट्याला अटक केली आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील धरणगाव नाका येथे २० रोजी सायंकाळी ६ वाजेच्या युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची रॅली हाेती.

त्यामुळे नागरिकाची गर्दी झाली होती. रॅलीचा फायदा घेत एका अज्ञात चोरट्याने नंदू रमण मिस्तरी यांचे १५ हजार रुपये, प्रवीण योगराज पाटील यांचे २३ हजार, आण्णा नारायण चौधरी यांचे २० हजार, जिजाबराव काशीराम पाटील यांचे ६ हजार, संजय बाबुराव पाटील यांचे ३ हजार ४०० रुपये, अनिल रामदास महाजन यांचे १ हजार ६०० रुपये, रतीलाल तुकाराम सोनार यांचे ५०० रुपये तसेच विनोद सर्जेराव पाटील यांचा ओपो कंपनीचा ५ हजारांचा मोबाइल, संजय एकनाथ महाजन यांचा ६ हजाराचा मोबाइल, रमेश महादू महाजन यांचा विवो कंपनीचा मोबाइल, जयवंत भिकन पाटील यांचा सॅमसंग कंपनीचा मोबाइल असा एकूण ९२ हजार रुपयांचा ऐवज या चोरट्यांनी लंपास करुन पाेबारा केला होते. या संदर्भात पोलिसांनी आज तपासचक्रे फिरवून नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील रोहिदास अशोक लोंढे (वय ३५) यास ताब्यात घेतले. ज्यांची रक्कम चोरी झाली आहे त्यांना पोलिस ठाण्यात बोलावले असता गर्दीत राेहिदास लाेंढे हाच युवक घिरट्या मारत असल्याचे निष्पन्न झाले. त्याने देखील कबुली जबाबात साथीदारांच्या साेबत मिळून मोबाइल व पाकिटे चोरल्याचे सांगितले. नंदू मिस्तरी यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल आहे.

कुस्त्यांच्या स्पर्धेतही चाेरट्यांनी केला हात साफ
विशेष म्हणजे २१ रोजी पाराेळा येथे माजी खासदार ए. टी. पाटील यांंनी कुस्त्यांची स्पर्धा शहरात आयाेजित केली हाेती. या कुस्त्यांच्या दंगलीतही मोठ्या प्रमाणात चाेरट्यांनी चोऱ्या केल्याचे समजते.

बातम्या आणखी आहेत...