आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिज्ञापत्र:अमळनेर तालुक्यातील 400 शिवसैनिकांनी दिले प्रतिज्ञापत्र

अमळनेर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर तालुक्यातून तब्बल ४०० शिवसैनिकांनी निष्ठेचे प्रतिज्ञापत्र त्यांना भेट दिले. या उपक्रमास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसापासून सुरुवात करण्यात आली. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून जल्लोष साजरा केला.

आम्ही सर्व बाळासाहेबांचे शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत, असा संकल्प या वेळी करुन अनेकांनी पक्षाच्या आदेशानुसार निष्ठेचे प्रतिज्ञापत्र सादर केले. या वेळी तालुकाप्रमुख विजय पाटील, शहर प्रमुख संजय पाटील, महिला जिल्हा उपप्रमुख मनीषा परब, नरेंद्रसिंग ठाकूर, सुंदरपट्टीचे सरपंच सुरेश पाटील, नितीन निळे, बाबू परब, अनंत निकम, साखरलाल महाजन, चंद्रशेखर भावसार, महिला आघाडीच्या संगीता शिंदे, सरस्वती काटकर, जयश्री पवार, छाया पाटील, दर्शना घाणेकर, कलाबाई पाटील, मानसी सोनार, उज्ज्वला अंधारे, युवती सेना प्रमुख जयश्री बैसाने, शहर प्रमुख उज्ज्वला पाटील, महेंद्र कदम व शिवसैनिक उपस्थित होते. हे प्रतिज्ञापत्रे मुंबई येथील सेना भवनात पाठवले जाणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...