आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपात्र घोषित:सरपंचांपाठोपाठ आता ग्रामपंचायत सदस्याही अपात्र

कासोदा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामपंचायतीची परवानगी न घेता चार ते पाच हजार चौरस फूट जागेवर अतिक्रमण करून, गुरांसाठी शेड बांधल्याने, जवखेडेसीम येथील ग्रामपंचायत सदस्या जिजाबाई दत्तू पाटील यांना जिल्हाधिकाऱ्यांनी २६ जुलै रोजी अपात्र घोषित केले. विशेष म्हणजे याप्रकरणी सरपंच दिनेश पाटील यांनी तक्रार केली होती. त्यांच्यावरही अतिक्रमणप्रकरणी अपात्रतेची कारवाई झाली आहे.

जवखेडेसीमचे सरपंच दिनेश पाटील यांनी १५ मार्च २०२१ रोजी ग्रामपंचायत सदस्या जिजाबाई पाटील यांच्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. जिजाबाई पाटील यांनी पदाचा गैरवापर करत ग्रामपंचायतीच्या चार ते पाच हजार चौरस फूट गावठाण जागेवर, गुरे बांधण्यासाठी शेड बांधकाम करून अतिक्रमण केले असल्याचे तक्रार अर्जात म्हटले होते. त्याबाबत चौकशी होऊन महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार, ग्रा.पं. सदस्या जिजाबाई पाटील यांना अपात्र केले.

बातम्या आणखी आहेत...