आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरींचे आगमन:चाळीसगाव येथे गणपतीपाठाेपाठ गाैरींच्या आगमनानंतर झाले पूजन

चाळीसगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पारंपरिक गौरी गीते गात शनिवारी घरोघरी गौरीचे वाजत गाजत आगमन झाले. सुवासिनींनी सुंदर वस्त्रालंकार परिधान करून मोठ्या थाटामाटाने गौरींचे स्वागत केले. गणपती बसल्यानंतर तिसऱ्या दिवशी गौरींचे आगमन होते. घरातल्या सुवासिनींनी वाजत गाजत गौरींना घरात आणले. यानंतर पारंपरिक पद्धतीने गौरींची मनोभावे पूजा करण्यात आली. दुपारनंतर मुखवट्यासह सजलेल्या गौरी उभारण्यासाठी गृहिणींचा उत्साह ओसंडून वाहत होता. गणरायाच्या मखराजवळ सजवलेल्या गौरी उभारल्यानंतर त्यांचे साग्रसंगीत पूजन करण्यात आले.

गौरीसाठी करण्यात आलेल्या फराळाचे ताट मांडण्यात आले. दागिन्यांनी मढलेल्या गौरीला नैवेद्य दाखवण्यात आला. ‘गौरी आली गौरी, सोन्याच्या.. रुप्याच्या पावलानं, धनसंपदेच्या पायी, सुखशांतीच्या पायी’ अशा गजरात घरोघरी गौरींचे आगमन झाले. पहिल्या दिवशी गाैरींना मेथीची भाजी, भाकरी व गुळाचा नैवैद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी अभिषेक, महिलांना हळदी-कुंकू, पूजा व आरतीचे आयोजन करून प्रसादाचे वाटप करण्यात येते. तर तिसऱ्या दिवशी गाैरीचे विसर्जन करण्यात येते. गाैरीला गणपतीची बहीण मानली जाते. त्यामुळे गणपती बसल्यानंतर तिसऱ्याच दिवशी गाैरीचे आगमन होते. माहेराला आलेल्या लेकीप्रमाणे गाैरीची सर्व आरास करून लाड पुरवण्यात येतात. गाैरीचा उत्सव भक्तिपूर्ण वातावरणात साजरा हाेताे.

बातम्या आणखी आहेत...