आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराचे अतिक्रमण निघाल्याने महिला अत्यवस्थ:महिलेच्या मृत्यूनंतर अमळनेर येथील अतिक्रमण निर्मूलन माेहीम तूर्त स्थगित

अमळनेर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतिक्रमण काढण्याचे शुक्रवारी काम सुरू असताना येथील बेघर झालेल्या एका महिलेला हृदयविकाराचा त्रास जाणवला. त्यानंतर रुग्णालयात दाखल केले हाेते. उपचारादरम्यान शनिवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. यामुळे संतप्त समाजबांधवांनी शनिवारी दुपारी मृतदेह तहसील कार्यालयात नेऊन आंदोलनाची भूमिका घेतली. अखेर ५ डिसेंबरपर्यंत अतिक्रमण मोहिम थांबवण्यासह याबाबत २१ राेजी पालिकेत बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शोभाबाई रोहिदास पांचाळ (वय ४५) असे मृत महिलेचे नाव आहे. फायनल प्लॉट १२३मध्ये त्यांचा अनेक वर्षापासून रहिवास आहे. अशातच शुक्रवारी सायंकाळी पांचाळ कुटुंबीयांची घरे हटवताना शोभाबाई पांचाळ यांना हृदयविकाराचा त्रास जाणवला. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असताना त्यांचा सकाळी ६.३० वाजता मृत्यू झाला.

त्यानंतर धुळे येथे त्यांचे शवविच्छेदन केल्यानंतर संतप्त झालेल्या समाजबांधवांनी त्यांचा मृतदेह थेट तहसीलदार कार्यालयात आणला. या वेळी प्रशासन अधिकारी संजय चौधरी, सोमचंद संदानशिव, उपनिरीक्षक गंभीर शिंदे, पोलिस नाईक डॉ. शरद पाटील यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

संतप्त महिलांनी दिले पत्र : या वेळी संतप्त महिलांनी मुख्याधिकाऱ्यांना पत्र देत, तेथेच जागा द्या. अतिक्रमणाच्या दबावाने शोभाबाईंचा मृत्यू झाल्याने त्यांच्या वारसाला पाालिकेत नोकरी द्यावी, अतिक्रमण पथक प्रमुख व कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा आदी मागण्या केल्या आहेत.

पालिकेने लेखी आश्वासनानंतर केले अंत्यसंस्कार ...
तीव्र भूमिका लक्षात घेता या भागातील कुटुंबीयांना लेखी दिले. त्यात, फायनल प्लॉटमधील अतिक्रमण काढण्याची मोहीम ५ डिसेंबरपर्यंत थांबवेत आहाेत. यासंदर्भात प्रतिनिधींची २१ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता पालिकेच्या कार्यालयात मुख्याधिकाऱ्यांसाेबत बैठक होईल, असे आश्वासन दिले. यानंतर संबंधित महिलांनी शाेभाबाई पांचाळ यांना मृतदेह नेत सायंकाळी ताडेपुरा स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार केले.

बातम्या आणखी आहेत...