आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्स्फूर्त प्रतिसाद‎:एरंडोलला अग्निवीर‎ प्रशिक्षणाचा समारोप‎ ; 50 विद्यार्थ्यांनी नोंदवला सहभाग

एरंडोल‎6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील दादासाहेब दि.शं. पाटील‎ महाविद्यालयात ८ मार्चपासून सुरु‎ झालेल्या अग्निवीर भरती‎ प्रशिक्षणाचा १४ रोजी समारोप‎ झाला. या प्रशिक्षणात‎ महाविद्यालयातील ५० विद्यार्थ्यांनी‎ सहभाग घेतला.‎ अध्यक्षस्थानी अमित पाटील‎ होते. प्राचार्य डॉ.ए.जे.पाटील, माजी‎ सैनिक सुभेदार रघुनाथ सुतार,‎ उपप्राचार्य डॉ. ए. ए. बडगुजर,‎ मार्गदर्शक अनिल पाटील व सैय्यद‎ मुसा, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. के.‎ जे. वाघ, विद्यार्थी विकास‎ अधिकारी डॉ. एच. एम. पाटील,‎ युवती सभा सचिव डॉ. एस. व्ही.‎ शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती.‎ सहभागी विद्यार्थ्यांनी गोळाफेक,‎ पुलअप, पुशअप, रनिंग यासारखी‎ मैदानी प्रात्याक्षिके केली.‎

विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन‎ ठेवला, मेहनतीची तयारी ठेवली तर‎ यश निश्चितच प्राप्त होते, असे‎ मान्यवरांनी सांगितले. प्रास्ताविक‎ डॉ. स्वाती शेलार यांनी केले. डॉ.‎ सविता पाटील यांनी सूत्रसंचालन‎ केले. डॉ. शर्मिला गाडगे यांनी प्रमुख‎ पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ.‎ सचिन पाटील यांनी आभार मानले.‎ डॉ. सचिन पाटील, प्रा. सुनिल‎ सजगणे, प्रा.अतुल पाटील, डॉ.‎ रेखा साळुंखे, डॉ.नरेंद्र तायडे यांनी‎ विशेष सहकार्य केले. लष्करात‎ भरती होण्याचे स्वप्न असलेल्या‎ युवकांसाठी अग्नीवीर भरती‎ प्रशिक्षण मार्गदर्शक ठरले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...