आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:आडगाव येथे शेतीचा वाद; गुन्हा दाखल ; शिवीगाळ करत फावडा व दगडाने मारहाण

पारोळा19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील आडगाव येथील वडिलांनी दिलेल्या निम्मे बटाईच्या शेती-धारकाला त्यांच्या दोन्ही मुलांनी मारहाण करुन जखमी केल्याची घटना घडली आहे. आडगाव येथील योगेश कपुरचंद हटकर गेल्या काही वर्षापासून धोंडू हटकर यांचे शेत ते निम्मे बटाईने करत आहेत. १० रोजी दुपारच्या सुमारास धोंडू हटकर यांचा मुलगा प्रवीण धोंडू हटकर, लक्ष्‍मण धोंडू हटकर हे आले. त्यांनी योगेश हटकर यांना शेती कसण्यास मज्जाव केला व योगेश हटकर त्यांची पत्नी भारती हटकर यांना शिवीगाळ करत फावडा व दगडाने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. याबाबत पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...