आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी क्षेत्रभेट उपक्रम:यावल महाविद्यालयाचा कृषी क्षेत्रभेट‎ उपक्रम; कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन‎

यावल‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक‎ सहकारी समाजाचे, कला, वाणिज्य,‎ विज्ञान महाविद्यालय यावल आणि‎ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर‎ महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या‎ संयुक्त विद्यमाने, कृषी विषयक‎ जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला.‎ प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या‎ मार्गदर्शनाखाली कृषी क्षेत्रभेट आयोजित‎ करण्यात आली.‎ महाविद्यालयातील विद्यार्थिनी,‎ प्राध्यापक उपस्थित होते. यावलचे कृषी‎ अधिकारी एस.बी.सिनारे यांच्या‎ मार्गदर्शनाखाली कैलास बारेला व‎ एम.एस.मिटके यांनी महाविद्यालयातील‎ विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. कैलास‎ बारेला यांनी पोषण आहाराविषयी‎ तृणधान्य वापराचे महत्व सांगितले.

तर‎ कृषी सहाय्यक एस.बी.मिटके यांनी कृषी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ विषयक विविध योजना, कृषी अवजारे‎ तसेच सेंद्रिय शेती या विषयांवर भर‎ दिला. उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार,‎ विद्यार्थी कल्याण अधिकारी‎ प्रा.एस.पी.कापडे उपस्थित होते.‎ अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा.ए.पी.पाटील‎ होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन‎ करताना विषमुक्त आहार व त्याचे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ महत्त्व पटवून दिले. त्याचबरोबर या‎ कार्यक्रमाला महाविद्यालयातील‎ डॉ.अनिल पाटील, डॉ.संतोष जाधव,‎ प्रा.कामडी. प्रा पवार, प्रा.कोष्टी, प्रा.नरेंद्र‎ पाटील, प्रा.मोरे यांनी कार्यक्रम‎ यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.‎ सूत्रसंचालन रोहिणी अहिरे यांनी केले,‎ आभार प्राची पाटील यांनी मानले.‎

बातम्या आणखी आहेत...